फेअरप्ले ॲपवर इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) बेकायदेशीर स्ट्रीमिंगप्रकरणी अभिनेत्री तमन्ना भाटियाला महाराष्ट्र सायबर सेलने समन्स बजावले आहेत. याप्रकरणी सोमवारी अभिनेत्री चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं आहे. आयपीएलच्या 2023 एडिशनच फेअरप्ले ॲपवर अनधिकृत प्रक्षेपण केल्या प्रकरणी अभिनेत्रीला समन्स बजावण्यात आला आहे. त्यामुळे आज अभिनेत्री चौकशी हजर राहणार का? आणि अभिनेत्री चौकशीत काय सांगेल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
फेअरप्ले ॲपवर इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) बेकायदेशीर स्ट्रीमिंगप्रकरणी फक्त तमन्ना नाही तर, इतर सेलिब्रीटी देखील वादाच्या भोवऱ्यात आहेत. अभिनेता संजय दत्त, रॅपर बादशाह जॅकलीन फर्नांडिस यांनीदेखील ॲपच प्रमोशन केलं होतं.
आयपीएलच्या 2023 एडिशनच अनधिकृतरित्या प्रक्षेपण केल्यामुळे 100 कोटींहून अधिक नुकसान झाल्याचा वायकॉम 18 चा आरोप आहे. याप्रकरणी पर्यंत रॅपर बादशाहचा जबाब नोंदवण्यात आला आहे. तर संजय दत्त भारतात नसल्यामुळे अभिनेत्याने सायबर सेलकडे आणखी वेळ मागितला आहे. आता याप्रकरणी कोणती माहिती समोर येते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सांगायचं झालं तर, आयपीएलच्या सामन्यांचे हक्क ‘वायकॉम 18’ यांच्याकडे आहेत. मात्र फेअरप्ले ॲपवर बेकायदेशीरपणे सामन्यांचं स्ट्रिमिंग होत असल्याचं लक्षात आल्यानंतर महाराष्ट्र सायबर सेलने तक्रार नोंदवली. आता या प्रकरणाची अधिक चौकशी महाराष्ट्र सायबर सेलकडून होणार आहे. यासाठी आज तमन्ना हिला चौकशीसाठी उपस्थित राहवं लागणार आहे. चौकशीसाठी अभिनेत्री उपस्थित राहणार की नाही… याची देखील चर्चा रंगलेली असते.
2022 मध्ये ‘वायकॉम 18’ ने 2023 पासून 2027 पर्यंतच्या सर्व सीझनसाठी आयपीएलचे डिजिटल राईटस् घेतले आहेत. यासाठी प्लॅटफॉर्मने तब्बल 23758 कोटी रुपयांचा करार केला आहे. पण काही वेबसाईट्सवर बेकायदेशीर रित्या आयपीएलचं प्रसारण करण्यात येतं. ज्यामुळे ‘वायकॉम 18’ कोट्यवधी रुपयांचं नुकसान होतं.
तमन्ना भाटिया लवकरच कॉमेडी हॉरर ‘अरनमनई 4’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमा 3 मे रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. सिनेमात तमन्ना हिच्यासोबत अभिनेत्री राशी खन्ना देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तमन्ना सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.