कपूर कुटुंबाच्या सूनेचा मोठा निर्णय; रॉयल लाईफ स्टाईल सोडून जगणार ‘असं’ आयुष्य?

| Updated on: Jun 10, 2023 | 3:25 PM

कपूर कुटुंबाची सून स्वतःचं घर सोडून राहणार 'या'ठिकाणी, रॉयल लाईफ स्टाईलचा करणार त्याग? नक्की काय आहे रहस्य..., सर्वत्र कपूर कुटुंबाच्या सूनेची चर्चा...

कपूर कुटुंबाच्या सूनेचा मोठा निर्णय; रॉयल लाईफ स्टाईल सोडून जगणार असं आयुष्य?
Follow us on

मुंबई | बॉलिवूडच्या सर्वात प्रसिद्ध कुटुंबांपैकी एक कुटुंब म्हणजे कपूर कुटुंब… बच्चन, खान, यांच्याप्रमाणे कपूर कुटुंब देखील कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतं. कपूर कुटुंबातीस मुली आणि सुनांची रॉयल लाईफ स्टाईल आणि त्यांच्या महागड्या वस्तू चाहत्यांमध्ये कायम चर्चेचा विषय असतात. आता देखील कपूर कुटुंबातील एक सून चर्चेत आली आहे. ज्यामुळे कपूर कुटुंब पुन्हा चाहत्यांमध्ये चर्चेत. कपूर कुटुंबाच्या सुनेने स्वतःचं घर आणि रॉयल लाईफ स्टाईल सोडून एका महत्त्वाच्या ठिकाणी जाण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे सर्वत्र चर्चांना उधाण आलं आहे. कपूर कुटुंबाची सून आणि संजय कपूर याची पत्नी माहीप कपूर हिने मोठा निर्णय घेतला आहे. माहीप कपूर हिच्या निर्णयाचं काही जणांनी कौतुक केलं आहे तर, काहींनी मात्र माहीप कपूर हिला ट्रोल केलं आहे.

माहीप कपूर कपूर तिच्या रॉयल लाईफ स्टाईलचा त्याग करत ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगत आहे. सध्या सर्वत्र ‘बिग बॉस ओटीटी’ शोची चर्चा रंगत आहे. शिवाय शोमधील स्पर्धकांची नावे देखील समोर येत आहेत. अशात अभिनेता सलमान खान याच्या रिऍलिटी शोमध्ये माहीप कपूर हिची देखील एन्ट्री होणार असल्याची चर्चा रंगत आहे.

बॉलिवूडच्या प्रसिद्ध कुटुंबातील सून रिऍलिटी शोमध्ये येणार असल्यामुळे सर्वत्र चर्चांना उधाण आलं आहे. यासाठी कपूर कुटुंबाचे चाहते उत्सुक आहेत. पण यावर कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. माहीप कपूर हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, ती एक प्रसिद्ध ज्वेलरी डिझायनर आहे. तिच्याकडून अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी ज्वेलरी डिझाईन करुन घेतली आहे.

हे सुद्धा वाचा

माहीप कपूर कायम तिच्या रॉयल आयुष्यामुळे चर्चेत असते. ‘बॉलिवूड वाईव्स’च्या दोन्ही सीझनमध्ये माहीप कपूर हिच्या लाईफ स्टाईलची तुफान चर्चा रंगली. माहीप कपूर हिच्याकडे महागड्या गाड्यांचं कलेक्शन देखील फार मोठं आहे. माहीप कपूर हिला दोन मुलं आहेत. माहीप कपूर हिच्या मुलाचं नाव झहान आणि मुलीचं नाव शनाया कपूर असं आहे..

माहीप कपूर हिला लग्नाआधी बॉलिवूडमध्ये पदार्पण करायचं होतं. पण तसं होवू शकलं नाही, अखेर अभिनेत्री १९९८ साली अभिनेता अनिल कपूर याचा भाऊ संजय कपूर याच्यासोबत लग्न केलं. संजय कपूर प्रॉडक्शन हाऊसमध्ये दिग्दर्शक आहे. सध्या सर्वत्र माहीप कपूर हिची चर्चा रंगत आहे.