Mahekk Chahal Admitted In Hospital: अनेक टीव्ही मालिकांमध्ये चाहत्यांचं मनोरंजन करणारी अभिनेत्री महेक चहल (Mahekk Chahal) हिची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून खालावली आहे. ज्यामुळे अभिनेत्रीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. गेल्या ८ दिवसांपासून अभिनेत्रीचे रुग्णालयात उपचार सुरु आहेत. महेक सध्ये ‘नागिन 6’ (nagin 6) मालिकेतून चाहत्यांचं मनोरंजन करत आहे . आता महेकला न्यूमोनिया झाल्यामुळे अभिनेत्री आराम करत आहे.
न्यूमोनियाची लागण झाल्यानंतर अभिनेत्रीला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आता अभिनेत्रीची प्रकृती स्थिर आहे. महेकला रुग्णालयातून डिस्चार्ज देखील देण्यात आला आहे. चाहत्यांना प्रकृतीबाबत माहिती देण्यासाठी तिने खास पोस्ट शेअर केली आहे. (Mahekk Chahal Admitted In Hospital)
चाहत्यांसाठी पोस्ट शेअर करत अभिनेत्री म्हणाली, ‘माझी प्रकृती आता स्थिर आहे. न्यूमोनियावर मात केल्यानंतर आता मला बरं वाटत आहे आणि मी माझ्या घरी आराम करत आहे. मझ्या सर्व शुभचिंतकांनी दिलेल्या प्रेमाचे आभार मानते…’ (Mahekk Chahal health update)
अभिनेत्री पुढे म्हणते, ‘यावेळी तुम्ही माझ्यासाठी केलेली प्रार्थना फलदायी ठरली. काही काळ कुटुंबासोबत राहण्याची संधी मिळाली. लवकरच तुम्हा सर्वांचं मनोरंजन करण्यासाठी परतेल…’ असं महेक पोस्टमध्ये म्हणाली. सध्या अभिनेत्री पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
८ दिवस रुग्णालयात होती अभिनेत्री
महेकला न्यूमोनियामुळे २ जानेवारीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे जवळपास चार दिवस अभिनेत्री रुग्णालयात व्हेंटिलेटरवर होती. तिला श्वास घेण्यास त्रास होत होता, त्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर अभिनेत्रीला न्यूमोनियाची लागण झाल्याचं लक्षात आलं. आता अभिनेत्रीची प्रकृती स्थिर आहे.