हैदराबाद : दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूचा चुलत भाऊ विजय कृष्ण नरेश ऊर्फ नरेश बाबू यांनी वयाच्या 63 व्या वर्षी चौथ्यांदा लग्नगाठ बांधली आहे. या लग्नाचा व्हिडीओ त्यांनी ट्विटरवर पोस्ट केला आहे. नरेश यांनी पवित्रा लोकेशशी लग्न केलं असून या लग्नाला मोजकेच नातेवाईक आणि मित्रमैत्रिणी उपस्थित होते. ‘आमच्या या नवीन प्रवासातील शांती आणि आनंदासाठी तुम्हा सर्वांचा आशीर्वाद हवा आहे’, असं कॅप्शन देत त्यांनी हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये नरेश आणि पवित्रा लोकेश हे दाक्षिणात्य विवाहपरंपरेनुसार लग्नाचे विधी पार पाडताना दिसत आहेत.
नरेश यांचं हे चौथं लग्न असून पवित्राचं हे तिसरं लग्न आहे. गेल्या काही काळापासून ते पवित्रासोबतच्या अफेअरमुळे चर्चेत होते. नवीन वर्षाच्या सुरुवातीला त्यांनी पवित्रासोबतचा लिपलॉक करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लग्नाची माहिती होती. हे लग्न जाहीर केल्यापासून त्यांचं तिसऱ्या पत्नीशी वाद सुरू होते. विशेष म्हणजे नरेश यांची तिसरी पत्नी रम्या यांनी एका हॉटेलच्या रुममध्ये पवित्रा आणि त्यांच्या पतीला रंगेहाथ पकडलं होतं.
ज्येष्ठ डान्स मास्टर श्रीनू यांच्या मुलीशी नरेश यांनी पहिलं लग्न केलं होतं. या दोघांना नवीन विजय कृष्ण हा मुलगा आहे. त्यानंतर नरेश यांनी प्रसिद्ध कवी आणि गीतकार देवुलपल्ली यांची नात रेखा सुप्रियाशी दुसरं लग्न केलं होतं. जवळपास दहा वर्षांपूर्वी दुसऱ्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर त्यांनी रम्या रघुपतीशी तिसरं लग्न केलं. रम्या ही नरेश यांच्यापेक्षा 20 वर्षांनी लहान आहे. या दोघांनाही एक मुलगा आहे.
Seeking your blessings for a life time of peace & joy in this new journey of us?
ఒక పవిత్ర బంధం
రెండు మనసులు
మూడు ముళ్ళు
ఏడు అడుగులు ?మీ ఆశీస్సులు కోరుకుంటూ ఇట్లు
– మీ #PavitraNaresh ❤️ pic.twitter.com/f26dgXXl6g— H.E Dr Naresh VK actor (@ItsActorNaresh) March 10, 2023
नरेश यांनी सुरुवातीला पवित्राला डेट करत असल्याचं वृत्त नाकारलं होतं. मात्र नंतर त्यांनी अचानक सोशल मीडियावर तिच्यासोबतचा लिपलॉक करतानाचा व्हिडीओ पोस्ट करत लग्न करत असल्याचं जाहीर केलं होतं. काही दिवसांपूर्वीच नरेश यांनी पत्रकार परिषद घेत रम्यावर आरोप केले होते. रम्याने मला जीवे मारण्यासाठी सुपारी दिली आहे, असा आरोप त्यांनी केला होता आणि पोलिसांकडे सुरक्षेची मागणी केली होती. रम्याचे इतर अफेअर्स असल्यामुळेच तिला सोडण्याचा निर्णय घेतला असं त्यांनी या पत्रकार परिषेदत सांगितलं होतं.
नरेश बाबू हे तेलुगू चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. बालकलाकार म्हणून त्यांनी करिअरची सुरुवात केली होती. मात्र नरेश नेहमीच त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहिले आहेत.