हैदराबाद: तेलुगू चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार महेश बाबूसाठी 2022 हे वर्ष एखाद्या वाईट स्वप्नासारखंच आहे. या वर्षात त्याने आतापर्यंत कुटुंबातील तीन सदस्यांना गमावलं आहे. आधी मोठा भाऊ, त्यानंतर आई आणि आता महेश बाबूच्या वडिलांनी या जगाचा निरोप घेतला. जवळच्या व्यक्तीच्या निधनाचं दु:ख पचवणं खूप कठीण असतं. त्यातच हा धक्का वारंवार मिळाल्यास भावनिकदृष्ट्या माणूस खचतो. महेश बाबू आणि त्याच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळल्याने चाहतेसुद्धा शोक व्यक्त करत आहेत.
जवळपास दीड महिन्याआधी महेश बाबूने आईला गमावलं. 28 सप्टेंबर 2022 रोजी इंदिरा देवी यांचं निधन झालं. त्या 70 वर्षांच्या होत्या. महेश बाबूचे वडील कृष्णा यांनी दोनदा लग्न केलं होतं. इंदिरा देवी यांना घटस्फोट दिल्यानंतर त्यांनी दाक्षिणात्य अभिनेत्री निर्मलाशी लग्न केलं. घटस्फोटानंतर इंदिरा देवी एकट्याच राहत होत्या. महेश बाबू त्याच्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढून आईला भेटायला जात असत.
महेश बाबूची या वर्षाची सुरुवात पण वाईट वृत्ताने झाली. 8 जानेवारी रोजी महेश बाबूचा मोठा भाऊ रमेश बाबू यांचं निधन झालं. ते 56 वर्षांचे होते. दीर्घ आजारानंतर त्यांनी या जगाचा निरोप घेतला. भावाच्या निधनाच्या वेळी महेश बाबूला कोरोनाची लागण झाली होती. भावासाठी त्यांनी भावूक पोस्टसुद्धा लिहिली होती.
His pain …. ??
Anna stay strong anna @urstrulyMahesh ?#RIPIndiraDeviGaru pic.twitter.com/ycZW7U8nDg
— Mummidivaram_MBFC?? (@MmdMaheshFC) September 28, 2022
भाऊ आणि आईच्या निधनाच्या झटक्यातून बाहेर येण्याआधीच महेश बाबूवर पुन्हा एकदा दु:खाचा डोंगर कोसळला. सोमवारी महेश बाबूचे वडील कृष्णा यांना कार्डिॲक अरेस्टमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मंगळवारी पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कृष्णा यांच्या निधनावर शोक व्यक्त करत असतानाच चाहत्यांनी महेश बाबू यांनाही आधार देण्याचा प्रयत्न केला आहे.