बॉलिवूडवर आज बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्री राज्य करत आहेत. पण एका काळ असा होता, जेव्हा अभिनेत्री त्यांच्या सौंदर्यानं दमदार अभिनयाने चाहत्यांना घायाळ करत होत्या. अशाच अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे परवीन बाबी… परवीन बाबी आज जगात नसल्या तरी कायम त्यांच्या कामामुळे आणि खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. परवीन यांनी ‘अमर अकबर एंथनी’, ‘सुहाग’, ‘काला पत्थर’, ‘द बर्निंग ट्रेन’, ‘नमक हलाल’, ‘कालिया’ यांसारख्या अनेक हीट सिनेमांमध्ये भूमिका बजावत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. परवीन बाबी त्यांच्या सिनेमांमुळे तर कायम चर्चेत राहिल्या, पण त्यांच्या खासगी आयुष्याच्या चर्चा तर आजही चाहत्यांमध्ये रंगलेल्या असतात.
परवीन बाबी कधी त्यांच्या लिव्ह-इन रिलेशनशिपमुळे चर्चेत राहिल्या, तर कधी त्यांच्या अफेअर्समुळे... परवीन बाबी यांनी डॅनी डँग्झोपा, कबीर बेदी, महेश भट्ट यांना डेट केलं. पण महेश भट्ट यांच्यासोबत असलेले परवीन यांचे संबंध आजही चर्चेत असतात. एका मुलाखतीत खुद्द महेश भट्ट यांनी परवीन यांच्यासोबत असलेल्या नात्याचा खुलासा केला होता. जेव्हा महेश भट्ट यांना समजावण्यासाठी परवीन नग्न अवस्थेत त्यांच्या मागे धावत होत्या…
एका मुलाखतीत महेश भट्ट म्हणाले होते, ‘परवीन आणि मी बेडरूममध्ये होतो. तेव्हा मला परवीन म्हणाली, ‘तुम्हाला मी हवी आहे की यू.जी?’ हे ऐकून मी हैराण झालो. मी तिच्याकडे रागात पाहायला लागलो… ती देखील मला रागात पाहत होती. मी काहीही बोललो नाही. पण तिला समजून गेलं होतं, तिच्या डोळ्यात पाणी होतं. त्यानंतर मी माझे कपडे घातले.
‘तिने मला एसी बंद करण्यासाठी सांगितलं. प्रचंड थंडी होती… खोलीत शांतता होती… बाहेर पाऊस पडत होता… मी गप्पपणे खोलीतून बाहेर आलो. ती मला सतत आवाज देत होती. पण मी मागे वळून पाहिलं नाही. मी लिफ्टची देखील प्रतीक्षा केली नाही. पायऱ्यांनी खाली उतरलो. ती देखील माझ्या पाठी धावत आली.. मला तिला थांबवायचं होतं..’
‘मला तिच्याकडे जाऊन तिला सांगायचं होतं तू अशा अवस्थेत (नग्न अवस्थेत) बाहेर येऊ नको. पण मी कशाचीच पर्वा केली नाही, पावसात मी तेथून निघून गेलो…’, महेश भट्ट आणि परवीन बाबी यांचं नातं फार काळ टिकलं नाही. पण जेव्हा अभिनेत्रीचं निधन झालं, तेव्हा महेश भट्ट यांनीच परवीन बाबी यांच्यावर अंत्यसंस्कार केले.
सांगायचं झालं तर, परवीन बाबी ज्या यू.जी यांचा उल्लेख करत होत्या, ते दुसरे तिसरे कोणी नाही महेश भट्ट यांचे मित्र आणि फिलॉस्फर यू.जी. कृष्णमूर्ती होते. यू,जी कायम महेश भट्ट यांना सांगायचे, ‘परवीन बाबी हिला सोड आणि कुटुंबाकडे परत जा..’
महेश भट्ट म्हणाले, ‘परवीन बाबी हिच्यासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहण्यासाठी मी पत्नी लॉरेन ब्राइट आणि मुलगी पूजा भट्ट हिला देखील सोडलं होतं. तेव्हा पूजा फक्त पाच वर्षांची होती..’ महेश भट्ट कायम त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात.
महेश भट्ट आणि पहिली पत्नी लॉरेन ब्राइट यांचं नातं देखील फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतर महेश भट्ट यांनी अभिनेत्री सोनी राजदान यांच्यासोबत लग्न केलं. महेश भट्ट आणि सोनी राजदान यांना दोन मुली आहेत.
महेश भट्ट आणि सोनी राजदान यांच्या पहिल्या मुलीचं नाव आलिया भट्ट आणि दुसऱ्या मुलीचं नाव शाहीन भट्ट असं आहे. आलिया भट्ट बॉलिवूडच्या प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत अव्वल स्थानी आहे. आलिया देखील कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते.