मुंबई : बॉलिवूडमध्ये अनेक दिग्दर्शक आहेत, ज्यांच्यामुळे अनेक अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या करियरला नवी दिशा मिळाली. अशाच दिग्दर्शकांपैकी एक नाव म्हणजे महेश भट्ट. महेश भट्ट यांनी अनेक सुपरहीट सिनेमे बनवले आणि असंख्य कलाकारांना फिल्म इंडस्ट्रीत संधी दिली. महेश भट्ट सुपरहीट सिनेमांपेक्षा जास्त त्यांच्यावर लागलेल्या आरोपांमुळे चर्चेत राहिलेत. ज्यामुळे महेश भट्ट यांना त्यांच्या आयुष्यात अनेक गोष्टींचा सामना करावा लागला. महेश भट्ट अनेक सिनेमे आजही चर्चेत आहेत, त्यामधील एक म्हणजे ‘अर्थ’ सिनेमा. सिनेमात अभिनेत्री शबाना आझमी यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती. ८० दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून शबाना आझमी यांची ओळख होती.
शबाना आझमी यांनी त्यांच्या सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये राज्य केलं. आज देखील शबाना आझमी यांची चर्चा चाहत्यांमध्ये रंगलेली असते. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत शबाना आझमी यांनी महेश भट्ट (Mahesh Bhatt) यांनी केलेल्या एका मेसेजबद्दल सांगितलं आहे. महेश भट्ट यांनी पाठवलेला मेसेज पाहिल्यानंतर शबाना आझमी यांच्या डोळ्यात पाणी आलं.
मुलाखतीत शबाना यांनी महेश भट्ट यांनी पाठवलेल्या एका मेसेजचा ऑडिओ क्लिप प्ले केला. ज्यामध्ये शबाना आझमी यांच्यासाठी खास मेसेज होता. मिळालेल्या माहितीनुसार, १९८२ साली प्रदर्शित झालेल्या ‘अर्थ’ सिनेमाचा महेश भट्ट यांनी उल्लेख केला. सिनेमाने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं.
ऑडिओमध्ये महेश भट्ट, शबाना आझमी यांच्याबद्दल म्हणाले, ‘शबाना आझमी यांच्या शिवाय ‘अर्थ’ सिनेमा शक्य नव्हता. सिनेमाच्या यशाचं श्रेय फक्त आणि फक्त शबाना यांना जातं. सिनेमासाठी शबानाने माझ्याकडून एक रुपया देखील घेतला नव्हता. त्या मला म्हणाल्या, तुम्ही सिनेमा तयार करा, मी सिनेमासाठी सर्वकाही करण्यासाठी तयार आहे.. ‘
एवढंच नाही तर, सिनेमाच्या सेटवर शबाना आझमी अन्य कलाकारांसाठी कपडे देखील आणायच्या. शिवाय स्वतःचं स्वतःचा मेकअप करायच्या. शबाना यांचं मन फार मोठं आहे… असं देखील महेश भट्ट अभिनेत्रीचं कौतुक करताना म्हणाले. महेश भट्ट यांनी केलेलं कौतुक ऐकून शबाना आझमी यांच्या डोळ्यात पाणी आलं.
महेश भट्ट (Mahesh Bhatt) दिग्दर्शित ‘अर्थ’ सिनेमात शबाना आझमी (Shabana Azmi) यांनी साकरालेली भूमिका महत्त्वाची ठरली. सिनेमात शबाना आझनी यांच्यासोबत दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटिल आणि अभिनेते कुलभूषण खरबंदा मुख्य भूमिकेत होते.