महिमा चौधरी हिच्या लेकीचं हटके ट्रांसफॉर्मेशन, आईपेक्षा अधिक ग्लॅमरस, फोटो पाहून म्हणाल…

| Updated on: Apr 16, 2024 | 10:02 AM

Mahima Chaudhry Daughter | वचाच्या 17 व्या प्रचंड ग्लॅमरस दिसते महिमा चौधरी हिची लेक आर्याना, अभिनेत्रीच्या लेकीचं हटके ट्रांसफॉर्मेशन पाहून चाहते हैराण... खुद्द महिमा चौधरी हिने पोस्ट केले आहेत काही फोटो... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त महिमा हिच्या लेकीच्या लूकची चर्चा...

महिमा चौधरी हिच्या लेकीचं हटके ट्रांसफॉर्मेशन, आईपेक्षा अधिक ग्लॅमरस, फोटो पाहून म्हणाल...
Follow us on

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमध्ये सेलिब्रिटी नाही तर, त्यांच्या मुलांची चर्चा सुरु आहे. सध्या अभिनेत्री काजोल देवगन – अभिनेता अजय देवगन यांची मुलगी निसा देवगन, तर दुसरीकडे अभिनेत्री रवीना टंडन हिची लेक राशा थडानी तुफान चर्चेत आहेत. दोघींचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. एवढंच नाहीतर, दोघी देखील फोटो पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतात. पण आता राशा, निसा नाहीतर, अभिनेत्री महिमा चौधरी हिची लेक आर्यना चौधरी हिच्या सौंदर्याची चर्चा रंगली आहे.

आर्यना चौधरी हिचा सुंदर चेहरा, देखीव डोळे, तिच्या स्माईलने तर, चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. खुद्द महिमा हिने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये अभिनेत्रीने कुटुंब आणि मुलीसोबत फोटोंचा व्हिडीओ तयार करत सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

हे सुद्धा वाचा

आर्याना नुकतीच तिची आई महिमा चौधरी आणि मित्रांसोबत सुट्टीवर दिसली होती. इन्स्टा हँडलवर व्हेकेशनचा व्हिडिओ शेअर करताना महिमा म्हणाली, ‘एका ट्विस्टसोबत व्हेकेशन… विमानांपासून दुरावा नाही… अनेक टेक ऑफ आणि लँडिग पाहिल्या… उत्तम दृश्य होतं…’ असं कॅप्शन लिहित अभिनेत्रीने हॉटेल रुम देखील व्हिडीओमध्ये दाखवला आहे. व्हिडीओमध्ये आर्याना देखील दिसत आहे…

 

 

आर्याना आता तिच्या आईसारखीच दिसू लागली आहे. याआधी देखील आर्याना हिला अनेकदा आईसोबत स्पॉट करण्यात आलं होतं. एका मुलाखतीत देखील आर्याना हिला विचारण्यात आलं होतं की, ‘आई प्रमाणेच बॉलिवूडमध्ये करियर करणार का?’ यावर आर्याना म्हणाली होती, ‘मला माझ्या आईप्रमाणे अभिनेत्री व्हायचं आहे…’

वयाच्या 17 व्या वर्षी महिमा चौधरी हिच्या लेकीचं हटके ट्रांसफॉर्मेशन पाहून चाहते देखील थक्क झाले आहेत. आर्याना हिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.  सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त आर्याना हिच्या लूकची चर्चा रंगली आहे.

महिमा चौधरी हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. प्रोफेशनल आयुष्यात अभिनेत्रीला यश मिळालं, पण खासगी आयुष्यात अभिनेत्रीला अनेक संकटांचा सामना करावा लागला. पतीपासून विभक्त झाल्यानंतर महिमा हिने मुलीचा ‘सिंगल मदर’ म्हणून सांभाळ केला. आज अभिनेत्री मुलीसोबत आनंदी आयुष्य जगत आहे.