मुंबई : आज मकरसंक्रांती, इंग्रजी वर्षातला हा पहिलाच सण… मकर संक्रांतीचा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. संक्रांतीच्या दिवशी लोक पतंग उडवतात आणि तिळ आणि गुळापासून बनवलेल्या पदार्थांचा आस्वाद घेतात. प्रत्येक जण आपल्या आप्तस्वकियांना, प्रियजणांना, मित्र मित्रणींना या सणाच्या शुभेच्छा देतो. तिळगूळ घ्या-गोडगोड बोला, अशा शुभेच्छा देऊन नातं घट्ट करण्याचा प्रत्येक जण प्रयत्न करतो. याला आपले सेलिब्रेटी तरी कसे अपवाद असतील? ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी, अभिनेता अक्षय कुमार, अभिनेता मनोज वाजपेयी, ते क्वीन कंगना राणावत पर्यंत अनेक सेलिब्रिटींनी मकर संक्रांतीच्या चाहत्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.
मकर संक्रातीच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. या दिवशी लोक खिचडी बनवतात. तसंच या दिवशी दानधर्म करण्याला विशेष महत्त्व आहे. उत्तर भारतात याला मकर संक्रांत म्हणतात, तर दक्षिण भारतात पोंगल म्हणून या सणाला संबोधतात.
अक्षय कुमारने कशा शुभेच्छा दिल्यात?
अक्षय कुमारने आपल्या ट्विटरवरुन चाहत्यांना संक्रांतीच्या शुभेच्छा देताना लिहिलंय, ”मिठे गुड में मिल गए तिल, उडी पतंग और खिल गए दिल…” यासोबतच अक्षयने त्याचा फोटोही शेअर केला आहे ज्यामध्ये तो पतंग उडवताना दिसत आहे.
मनोज वाजपेयीने ट्विटमध्ये काय म्हटलंय?
मनोज वायजेयीने चाहत्यांना मकर संक्रातीच्या शुभेच्छा देताना एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तीळ, गूळ आणि तीळगुळाचे लाडू दिसत आहेत. आपल्या चाहत्यांनी तिळगुळासारखंच गोड राहावं, अशा मनोकामना यानिमित्ताने त्याने दिल्या आहेत.
संक्रातीनिमित्त हेमा मालिनी आणि त्यांच्या लेकीकडून खास व्हिडीओ शेअर
दक्षिण भारतात मकर संक्रातीचा सण पोंगल म्हणून साजरा केला जातो. या विशेष दिवशी लोक आपली घरं सजवतात आणि पारंपारिक पदार्थ तयार करतात. अभिनेत्री हेमा मालिनी यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये त्या पोंगलची विशेष तयारी करताना दिसून येत आहेत. त्यांची मुलगी आणि अभिनेत्री ईशा देओलनेही एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ती तिच्या स्वयंपाकघरात कुठला तरी पदार्थ तयार करताना दिसून येत आहे.
क्वीन कंगनाने चाहत्यांना संक्रातीच्या कशा शुभेच्छा दिल्या?
कंगना राणावतने आपल्या इन्स्टा स्टोरीतून आपल्या लाखो चाहत्यांना मकर संक्रातीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. समुद्राच्या काठावर वाळूत मकर संक्राती लिहिलेलं असून त्याच्यावर खूप साऱ्या पतंग आहेत. तसंच एक आनंदाची स्मायली असून या संक्रातीच्या सणाच्या निमित्ताने कंगनाने चाहत्यांना गोड राहा, म्हणत शुभेच्छा दिल्या आहेत.
अभिनय क्षेत्रातून राजकारणाच्या पीचवर बॅटिंग करत असलेले भाजप नेते आणि खासदार मनोज तिवारी यांनीही आपल्या असंख्य चाहत्यांना मकर संक्रातीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचप्रमाणे धनुषने देखील आपल्या फॅन्सना संक्रातीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
संबंधित बातम्या