मुंबई : रोल, कॅमेरा, ऍक्शनच्या…. या झगमगत्या विश्वात अनेक कलाकारांना प्रसिद्धी आणि संपत्ती मिळाली. ८० च्या दशकातील अभिनेत्रींनी तर अनेक वर्ष बॉलिवूडवर राज्य केलं. एककाळ बॉलिवूडवर राज्य केलेल्या अभिनेत्रींना कालांतराने अंधारात आयुष्य घालवालं लागलं. असंच काही सिनेविश्वावर राज्य करणाऱ्या अभिनेत्री माला सिन्हा (mala sinha) यांच्यासोबत देखील झालं. माला सिन्हा यांनी आपल्या अभिनयाने आणि गायिकीने चाहत्यांच्या मनात घर केलं. पण त्यांच्यासोबत असं काही झालं ज्यामुळे संपूर्ण सिनेविश्वाला मोठा धक्का बसला. माला सिन्ह यांच्या घरातील बाथरुममध्ये सापडलेल्या लाखो रुपयांमुळे त्या तुफान चर्चेत आल्या. आज हाच किस्सा आपण जाणून घेवू.
माला सिन्हा यांनी यांनी अभिनयाची सुरुवात बंगाली सिनेमातून केली. सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी माला सुरुवातील रेडिओवर गाणं गायच्या. बंगाली सिनेमात काम करुन माला यांना हवी तशी प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळाली नाही. त्यानंतर माला मुंबईमध्ये आल्या. मुंबईत आल्यावर त्यांचे सर्व स्वप्न पूर्ण झाले. मुंबईत आल्यानंतर माला आणि गुरुदत्त यांची अचानक भेट झाली.
माला यांचं सौंदर्य पाहून गुरुदत्त यांनी अभिनेत्रीला सिनेमासाठी ऑफर देण्याचा विचार केला. त्यानंतर १९५७ साली आलेल्या ‘प्यासा’ सिनेमात माला यांनी मुख्य भूमिका साकारत चाहत्यांच्या मनात राज्य केलं. ‘प्यासा’ सिनेमानंतर माला यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यानंतर माला यांनी ‘हॅमलेट’, ‘बादशाह’, ‘रियासत’, ‘एकादशी’, ‘रत्न मंजरी’, ‘झांसी की रानी’, ‘पैसा ही पैसा’ आणि ‘एक शोला’ यांसारख्या सिनेमामध्ये भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं.
प्रचंड पैसा कमावणाऱ्या माला कंजूस देखील तितक्याच होत्या. एवढंच नाही तर, घरात नोकर ठेवले तर खर्च होईल, म्हणून त्या स्वतः घरातील सर्व कामे त्याच करायच्या. एकदा माला सिन्हा यांच्या मुंबईतील घरात इनकम टॅक्सचा छापा पडला. तेव्हा त्यांच्या घराच्या बाथरुममध्ये चक्क १२ लाख रुपयांची रोकड सापडली. तेव्हा १२ लाख रुपये फार मोठी रक्कम होती. (mala sinha family)
इनकम टॅक्स अधिकाऱ्याना सापडलेले पैसे वाचवण्यासाठी माला यांनी कोर्टामध्ये दिलेल्या कबुलीने सर्वांच्या भुवया उंचावल्या. माला सिन्हा यांनी कोर्टात एक धक्कादायक विधान केले, जप्त झालेले लाखो रुपये मी वेश्या व्यवसायात कमवले.. अशी लेखी कबुली माला सिन्हा यांनी कोर्टात दिली.
माला सिन्हा यांचे वडील अल्बर्ट यांना १२ लाख रुपये हातातून सहजासहजी जावू द्यायचे नव्हते. त्यामुळे वकिलांनी दिलेला सल्ला माला सिन्हा आणि वडिलांनी ऐकला आणि पैसे वाचवले. पण त्यानंतर माला यांच्याकडे लोक वाईट नजरेने पाहायचे. अखेर १९६६ साली माला यांनी नेपाली अभिनेता चिदाम्बर प्रसाद लोहानी यांच्यासोबत लग्न केलं.