मुंबई | 31 डिसेंबर 2023 : सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्री मलायका अरोरा हिच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे. नुकताच मलायका हिचा पहिला पती आणि अभिनेता अरबाज याने दुसरं लग्न केलं. अरबाज खान याच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर मलायका हिच्या आयुष्यात अभिनेता अर्जुन कपूर याची एन्ट्री झाली. गेल्या अनेक वर्षांपासून मलायका आणि अर्जुन एकत्र आहेत. शिवाय दोघांच्या लग्नाच्या चर्चा देखील सुरु आहे. एका कार्यक्रमात मलायका हिने दुसरं लग्न करणार असल्याची देखील कबुली दिली.. असं असताना देखील मलायका आणि अर्जुन याच्या ब्रेकअपच्या चर्चांनी जोर धरला आहे.
गेल्या काही दिवसांपासून मलायका आणि अर्जुन यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाल्याची चर्चा रंगली आहे. दरम्यान, ख्रिसमस पार्टीला देखील मलायका हिच्यासोबत अर्जुन नव्हता. मलायका हिने एकटीने तिच्या मित्रांसोबत ख्रिसमस साजरा केला. नुकताच मलायका हिला एका सलॉनबाहेर स्पॉट करण्यात आलं.
कायम एकत्र दिसणारे मलायका आणि अर्जुन आता पूर्वी प्रमाणे एकत्र येत नल्यामुळे दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चांनी जोर धरला आहे. मलायका हिच्या व्हिडीओवर नेटकरी कमेंट करत आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘ चांगलं आयुष्य होतं, पण अर्जुन याच्या नादात सर्वकाही खराब करुन ठेवलं आहे…’
दुसरा नेटकरी म्हणाला, ‘अर्जुन कपूर कुठे आहे? आता तुम्ही दोघे एकत्र का नाही दिसत? मलायका आणि अर्जुन यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, 2019 मध्ये दोघांनी त्यांच्या नात्याची कबुली दिली. त्याआधी 2017 मध्ये अरबाज सोबत अभिनेत्रीचा घटस्फोट झाला.
‘झलक दिखला जा’ शोमध्ये मलायका म्हणाली, ‘100 टक्के लग्न करण्यासाठी तायर आहे. जर कोणी मला लग्नासाठी विचारेल, तेव्हा दुसऱ्या लग्नासाठी तयार होईल असं अभिनेत्री म्हणाली…’ मलायका हिने दुसऱ्या लग्नाबद्दल वक्तव्य केलं. पण अभिनेत्रीने बॉयफ्रेंड अर्जुन कपूर याचं नाव घेतलं नाही. यामुळे देखील दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चांनी जोर धरला आहे.
मलायका कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. मलायका अरोरा सध्या ‘सिंगल मदर’ म्हणून मुलगा अरहान याचा सांभाळ करत आहे. मलायका हिने 1998 मध्ये अभिनेता अरबाज खान याच्यासोबत लग्न केलं. पण लग्नाच्या 18 वर्षांनंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतर मलायका हिने पूर्ण लक्ष करियरकडे केंद्रीत केलं. मलायका बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, छोट्या पडद्यावर आणि सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.