Malaika Arora and Arjun Kapoor Photo : अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) आणि अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. एवढंच नाही, तर अनेकदा त्यांच्या लग्नाच्या चर्चांनी देखील जोर धरला. पण दोघांनी त्यांच्या नात्याबद्दल सांगत रंगणाऱ्या लग्नाच्या चर्चांना पूर्णविराम दिला. कोणत्याही गोष्टीची तमा न बाळगता मलायका-अर्जुनने त्यांच्या भावनांना महत्त्व दिलं आणि सर्वांसमोर आपल्या नात्याची कबुली दिली. महत्त्वाचं म्हणजे दोघांचे फोटो आणि व्हिडीओ कायम व्हायरल होत असतात. दरम्यान, मलायकाने New Year सेलिब्रिशनचे फोटो देखील सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
मलायका आणि अर्जुनने भारतात नव्या वर्षाचं स्वागत केलं. नव्या वर्षाचं स्वागत आपल्या खास व्यक्तींसोबत करत मलायकाचे सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना देखील शुभेच्छा दिल्या. मलायकाने अर्जुनसोबत एक फोटो पोस्ट केला आहे. ज्यामध्ये दोघे प्रचंड आनंदी दिसत आहेत.
अर्जुनसोबत फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये, ‘Hello 2023 …. Love n light’ असं लिहिलं आहे. सध्या अभिनेत्रीची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.. मलायकाची पोस्ट पाहून अनेक सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी अभिनेत्रीला नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
घटस्फोटानंतर मलायकाच्या आयुष्यात अर्जुनची एन्ट्री
मलायका आणि अभिनेता अरबाज खान यांचं २०१७ मध्ये घटस्फोट झाला. जवळपास १९ वर्ष एकत्र राहिल्यानंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. मलायका आणि अरबाज यांना एक मुलगा देखील आहे. दोघे विभक्त झाले असले, तरी मुलासाठी कायम एकत्र दिसतात.
अरबाजसोबत घटस्फोट झाल्यानंतर मलायकाच्या आयुष्यात अर्जुनची एन्ट्री झाली. दोघांनी अनेक वर्ष त्यांच्या नात्याबद्दल मौन बाळगलं. अखेर दोघांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत प्रेमाची कबुली दिली.