अर्जुन कपूरशी लग्नासाठी नाही तर ‘या’ गोष्टीसाठी मलायकाने दिला होकार

| Updated on: Nov 10, 2022 | 6:13 PM

मलायकाच्या त्या पोस्टनंतर लग्नाची जोरदार चर्चा; मात्र खरं कारण वेगळंच!

अर्जुन कपूरशी लग्नासाठी नाही तर या गोष्टीसाठी मलायकाने दिला होकार
Arjun and Malaika
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई- गुरुवारी सकाळपासूनच अभिनेत्री मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्या लग्नाच्या चर्चांना सुरुवात झाली. यामागचं कारण म्हणजे मलायकाची पोस्ट. ‘मी हो म्हणाले’ असं कॅप्शन देत मलायकाने फोटो पोस्ट केला होता. गेल्या काही काळापासून या दोघांच्या नात्याविषयी सोशल मीडियावर चर्चा होती. त्यामुळे अखेर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला, असा अंदाज चाहत्यांनी वर्तवला. मात्र मलायकाने अद्याप लग्नासाठी अर्जुन कपूरला होकार दिलेला नाही. ती नेमकं कशाला ‘हो’ म्हणाली याचं कारण आता समोर आलं आहे.

मलायकाने एका नव्या शोला होकार दिला आहे. ‘मूव्हिंग इन विथ मलायका’ हा तिचा नवा शो डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोच्या माध्यमातून चाहत्यांना तिच्या खासगी आयुष्याविषयी जाणून घेण्याची संधी मिळणार आहे.

हे सुद्धा वाचा

मलायकाने इन्स्टाग्रामवर पोस्टर शेअर करत याविषयीची माहिती दिली. ‘हॉटस्टारवरील माझ्या नव्या शोसाठी मी होकार दिला आहे. जिथे तुम्हाला माझ्याबद्दल आणि माझ्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्याची संधी मिळणार आहे. तुम्हाला काय वाटलं? मी कशाबद्दल बोलत होते?’, असं कॅप्शन तिने या पोस्टरला दिलं आहे.

मलायकाचा हा नवीन शो येत्या 5 डिसेंबरपासून ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसारित होणार आहे. या शोद्वारे तिच्याविषयी, तिच्या कुटुंबीयांविषयी, कामाविषयी, मित्रमैत्रिणींविषयी बरीच माहिती चाहत्यांना मिळणार आहे.

मलायका आणि अर्जुन एकमेकांना डेट करत असल्याची गोष्ट सर्वश्रुत आहे. मात्र लग्नाविषयी त्यांनी अद्याप कोणताच निर्णय घेतला नाही. मलायकाशी इतक्यात लग्न करण्याचा कोणताच विचार नसल्याचं अर्जुनने कॉफी विथ करण या शोमध्ये स्पष्ट केलं होतं. सध्या तो करिअरवर अधिक लक्ष केंद्रीत करत असल्याचं त्याने सांगितलं होतं.

“नाही, आणि प्रामाणिकपणे सांगायचं झाल्यास लॉकडाऊनमध्ये गेलेली दोन वर्षं, कोरोना महामारी आणि त्यामुळे बदललेल्या गोष्टी कारणीभूत आहेत. मला माझ्या करिअरवर लक्ष केंद्रीत करायचं आहे”, असं अर्जुन म्हणाला होता.