अर्जुन कपूरला विसरणं मलायका साठी झालंय कठीण; म्हणाली, ‘आनंद आणि प्रेम दोन्ही…’

| Updated on: Sep 06, 2024 | 10:19 AM

Malaika Arora: अर्जुन कपूर याच्यासोबत ब्रेकअप, अभिनेत्याला विसरणं मलायका अरोरा हिच्यासाठी कठीण, 'ती' पोस्ट शेअर करत म्हणाली, 'आनंद आणि प्रेम दोन्ही...', सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मलायका अरोरा हिच्या पोस्टची चर्चा...

अर्जुन कपूरला विसरणं मलायका साठी झालंय कठीण; म्हणाली, आनंद आणि प्रेम दोन्ही...
Follow us on

अभिनेत्री मलायका अरोरा हिने कोणत्या सिनेमात मुख्य अभिनेत्री म्हणून भूमिका बजावली नाही. सिनेमांमध्ये आयटम सॉग्न करत मलायका हिने स्वतःची ओळख निर्माण केली. मलायका फक्त तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून कायम चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. आता देखील अभिनेत्री सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मलायका हिच्या पोस्टची चर्चा सुरु आहे.

अभिनेता अर्जुन कपूर याच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर मलायका कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. अभिनेत्री सतत सोशल मीडियावर काही ना काही पोस्ट शेअर करत असते. आता देखील अभिनेत्रीने इन्स्टाग्राम स्टोरीवर आयुष्यातील प्रेमाचं महत्त्व सांगितलं आहे. चाहते देखील अभिनेत्रीच्या पोस्टवर प्रतिक्रिया देत आहे.

इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर करत अभिनेत्री म्हणाली, ‘प्रकृती औषधांनी कधीच स्थिर होत आहे. मन आणि आत्माच्या शांतीमुळे प्रकृती स्थिर राहते. शिवाय आयुष्यात आनंद आणि प्रेम देखील तितकंच महत्त्वाचं आहे…’ असं देखील मलायका पोस्टच्या माध्यमातून म्हणाली आहे.

 

 

अभिनेत्रीने पोस्ट शेअर केल्यानंतर मलायका अद्याप अर्जुनच्या आठवणीत आहे… असं चाहते म्हणत आहे. अभिनेता अरबाज खान याला घटस्फोट दिल्यानंतर मलायका हिच्या आयुष्यात अर्जुन कपूर याची एन्ट्री झाली. तब्बल 6 वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांचे मार्ग वेगळे झाले. गेल्या अनेक दिवसांपासून मलायका आणि अर्जुन एकत्र दिसले नाहीत. एवढंच नाही तर, सोशल मीडियावर देखील आता दोघे एकमेकांसोबत फोटो पोस्ट करत नाहीत.

मलायका अरोरा – अर्जुन कपूर

अभिनेता अरबाज खान याच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर मलायका अभिनेता अर्जुन कपूर याच्यासोबत आनंदाने आयुष्य जगत होती. पण आता अर्जुन आणि मलायका यांचे मार्ग देखील वेगळे झाल्याची माहिती मिळत आहे. 2019 मध्ये मलायका – अर्जुन यांनी सर्वांसमोर नात्याची घोषणा केली.