अनिल अरोरा यांनी सहाव्या मजल्यावरून उडी मारली तेव्हा मलायकाची आई कुठे होती; पोलिसांनी दिली सर्वात मोठी अपडेट

| Updated on: Sep 11, 2024 | 4:10 PM

मलायका अरोरा हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. मलायका अरोराची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. मलायका अरोरा हिच्या आयुष्यात मोठे वादळ आल्याचे बघायला मिळतंय. मलायका अरोरा हिच्या वडिलांनी आत्महत्या करत आयुष्याचा शेवट केलाय.

अनिल अरोरा यांनी सहाव्या मजल्यावरून उडी मारली तेव्हा मलायकाची आई कुठे होती; पोलिसांनी दिली सर्वात मोठी अपडेट
malaika arora
Follow us on

मलायका अरोरा हिच्या वडिलांनी आत्महत्या केल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसल्याचे बघायला मिळाले. इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी घेत त्यांनी आत्महत्या केली. मलायकाच्या वडिलांच्या आत्महत्येनंतर अर्जून कपूर, अरबाज खान, सलमान खान आणि इतर काही जवळचे लोक घरी पोहोचले. मलायका अरोरा हिच्या वडिलांनी अखेर आत्महत्या का केली असा प्रश्न हा सातत्याने उपस्थित केला जातोय. पोलिसांनी या प्रकरणात तपास सुरू केलाय. ज्यावेळी मलायका अरोरा हिच्या वडिलांनी आत्महत्या केली, त्यावेळी मलायका ही मुंबईत नसून पुण्यात होती. आत्महत्येची माहिती मिळताच पुण्याहून मुंबईसाठी मलायका अरोरा निघाली.

पोलिसांकडून आत्महत्येचे कारण स्पष्ट नसल्याचेही सांगितले जातंय. मलायका अरोराच्या वडिलांनी वांद्रे येथील आयशा मनोर बिल्डिंगच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. ही घटना आज सकाळी नऊ वाजता घडल्याचे सांगण्यात येत आहे. मलायकाच्या वडिलांचे नाव अनिल अरोरा आहे.

घटनेच्या वेळी त्यांची पत्नीही घरात होती. घटनेची माहिती मिळताच वांद्रे पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह पीएम रिपोर्टसाठी बाबा रुग्णालयात पाठवला आहे. मलायकाच्या वडिलांनी आत्महत्या का केली याला अद्याप पुष्टी मिळालेली नाही. पोलिस सध्या या प्रकरणात तपास करत आहेत. राज टिळक रोशन डीसीपी, मुंबई पोलिस यांनी या प्रकरणात माहिती दिलीये.

राज टिळक रोशन म्हणाले की, आज सकाळी नऊ वाजता अनिल अरोरा नावाच्या व्यक्तीने आत्महत्या केली. प्राथमिक माहितीनुसार त्यांनी आत्महत्या केल्याचे कळतंय. आत्महत्या का केली हे अद्याप समजू शकले नाही, पोलिस तपास सुरू आहे. याच घटनेची माहिती मिळताच अभिनेता अरबाज खान घरी पोहोचला.

मलायकाचे वडील अनिल अरोरा यांनी आत्महत्या केल्याचे सध्या वांद्रे पोलिसांनी स्पष्ट केले आहे, मात्र त्यांनी आत्महत्या का केली? ही माहिती अद्याप प्राप्त झालेली नाही. फॉरेन्सिक टीम घराचे नमुने घेऊन आत्महत्या केल्याचे ठिकाण तपास करत आहे. वांद्रे पोलिसांनी घरातील सदस्यांची चौकशी केली असून इमारतीचे सुरक्षा रक्षकाचीही चौकशी केली.