अभिनेत्री मलायका अरोरा हिला आज कोणत्या ओळखीची गरज नाही. अभिनेत्री तिच्या प्रोफेशनल आयुष्यापेक्षा जास्त खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्रीच्या लग्नाच्या चर्चांनी देखील जोर धरला आहे. सांगायचं झालं तर, मलायका आज तिच्या अटींवर आयुष्य जगत आहे. पण एक काळ असा होता, जेव्हा अभिनेत्रीला अनेक संकटांचा सामना करावा लागला होता. एका कार्यक्रमात मलायका हिने तिच्या लहानपणी घडलेल्या मोठ्या घटनेबद्दल सांगितलं होतं. मलायका हिच्या लहानपणी घडलेली ‘ती’ घटना फार कमी लोकांना माहिती आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मलायका अररा हिची चर्चा रंगली आहे.
‘इंडियाज बेस्ट डान्सर’ रिऍलिटी शोमध्ये मलायका जजच्या भूमिकेत होती. शोच्या एका एपिसोडमध्ये अभिनेत्रीने तिच्या खासगी आयुष्याबद्दल मोठं वक्तव्य केलं होतं. लहान असताना अनेक गोष्टींचा सामना करावा लागला असल्याचं खुद्द अभिनेत्रीने सांगितलं होतं. अभिनेत्री फक्त 11 वर्षांची असताना वडिलांनी कुटुंबाची साथ सोडली होती.
मलायका म्हणाली होती, ‘मी फक्त 11 वर्षांची होती. तेव्हा वडिलांनी माझ्या आईची साथ सोडली. एकट्या आईने माझा आणि बहीण अमृता हिचा सांभाळ केला आहे. ती वेळ आमच्यासाठी फार कठीण होती. अनेक अडचणींचा सामना आम्ही केला आहे…’ जुने क्षण आठवत अभिनेत्रीच्या डोळ्यात पाणी देखील आलं. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मलायका अरोरा हिची चर्चा रंगली आहे.
बॉलिवूडमध्ये काम करत असताना मलायका अरोरा आणि अरबाज खान यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण त्यांचं लग्न फार काळ टिकू शकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतर मलायका हिच्या आयुष्यात अभिनेता अर्जुन कपूर याची एन्ट्री झाली तर, अरबाज याने मेकअप आर्टिस्ट शुरा खान हिच्यासोबत लग्न केलं आहे. अरबाज – शुरा यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते.
मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचा घटस्फोट 2017 मध्ये झाला. त्यानंतर 2019 मध्ये मलायका हिने अर्जुन कपूर याच्यासोबत असलेल्या नात्याची कबुली दिली. अनेकदा अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा हे एकसोबत स्पॉट देखील करण्यात आलं आहे. लवकरच अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा हे लग्न करणार असल्याची देखील जोरदार चर्चा रंगलेली असते. ‘योग्य वेळ आणि योग्य व्यक्ती भेटल्यानंतर नक्की लग्न करेल…’ असं वक्तव्य देखील अभिनेत्रीने केलं होतं.