मलायका अरोरा हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. मलायका अरोराची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. विशेष म्हणजे मलायका अरोरा ही कायमच सोशल मीडियावर सक्रिय देखील दिसते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना मलायका अरोरा दिसते. मलायका अरोरा हिने 2017 मध्ये अरबाज खान याच्यासोबत घटस्फोट घेतला. अरबाजसोबतच्या घटस्फोटानंतर मलायका अरोरा ही अर्जुन कपूर याचा डेट करत आहे. हेच नाही तर मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर हे लवकरच लग्न करणार असल्याची देखील जोरदार चर्चा आहे.
मलायका अरोरा हिने नुकताच एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केलीये. या पोस्टसोबतच मलायका अरोरा हिने खास फोटोही शेअर केले. या फोटोमध्ये मलायका अरोरा ही लेट नाईट पार्टी करताना दिसत आहे. विशेष म्हणजे मलायका अरोरा ही करिश्मा कपूर आणि अमृता अरोरा यांच्यासोबत खास पार्टी करताना दिसतंय.
अभिनेत्री करिश्मा कपूर ही आता 50 वर्षाची झालीये. तिच्या वाढदिवसानिमित्त खास पार्टीचे आयोजन करण्यात आले. मलायका अरोरा हिने हे लेट नाईट पार्टीचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले. मलायका अरोरा हिने लिहिले की, खूप सुंदर अशी 50 वर्ष पूर्ण केली आहेस. वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा…तुझ्यावर खूप सारे प्रेम करतो…
आता मलायका अरोरा हिची ही पोस्ट सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. चाहते मलायका अरोरा हिने शेअर केलेल्या या फोटोवर मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. अनेकांनी कमेंट करून करिश्मा कपूर हिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याचे देखील बघायला मिळतंय. करिश्मा आणि मलायका अरोरा चांगल्या मैत्रिणी आहेत.
विशेष म्हणजे मलायका अरोरा हिने शेअर केलेल्या फोटोमध्ये सर्वजण धमाल करताना दिसत आहेत. यावेळी मलायका अरोरा ही जबरदस्त अशा लूकमध्ये दिसत आहे. मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर हे लवकरच लग्न करणार असल्याची चर्चा आहे. कपूर खानदानामध्ये सर्वात अगोदर आता अर्जुन कपूर याचे लग्न होणार असल्याचे अनिल कपूर यांनी म्हटले होते.