मलायका अरोरा हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. मलायका अरोराची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. विशेष म्हणजे मलायका अरोरा ही कायमच आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मलायका अरोरा ही आपल्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आलीये. अरबाज खान याच्यासोबत घटस्फोट घेतल्यापासून मलायका अरोरा ही अजून कपूर याला डेट करतंय. मात्र, काही दिवसांपासून सतत चर्चा सुरू आहे की, मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांचे ब्रेकअप झाले आहे. अर्जुन कपूर याच्यासोबतच्या ब्रेकअपची चर्चा असतानाच मलायका अरोरा ही सतत विदेशात जाताना दिसत आहे.
मलायका अरोरा हिने काही खास फोटो शेअर केले होते. त्या फोटोमध्ये मलायका अरोरा ही मालदीवमध्ये खास वेळ घालवताना दिसली. यावेळी तिने एक पोस्टही शेअर केली. मलायका अरोरा ही आता मालदीवनंतर थेट पॅरिसला पोहोचली आहे. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतीय खेळाडूंना सपोर्ट करण्यासाठी मलायका अरोरा पोहोचली आहे.
मलायका अरोरा हिने आता पॅरिसमधील काही खास फोटो शेअर केले आहेत. विशेष म्हणजे या फोटोंमध्ये जबरदस्त अशा लूकमध्ये मलायका अरोरा ही दिसत आहे. मात्र, मलायका अरोरा हिचे पॅरिसमधील फोटो पाहून चाहत्यांना मोठा धक्का बसल्याचे बघायला मिळतंय. अनेकांनी मलायका अरोरा हिला अर्जुन कपूर कुठे असल्याचे विचारते.
कायमच मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर हे विदेशात चांगला वेळ एकत्र घालताना दिसतात. मात्र, आता पॅरिसला मलायका अरोरा ही एकटीच पोहोचली आहे. मलायका अरोरा हिचे पॅरिसमधील सर्व फोटो आणि व्हिडीओ पाहून एका लिहिले की, फोटो आणि व्हिडीओ काढणारा तो व्यक्ती कोणा आहे? काही दिवसांपूर्वीच अर्जुन कपूर याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती.
त्याच्या या पोस्टनंतरच मलायका आणि त्याचे ब्रेकअप झाल्याची चर्चा रंगताना दिसली. अनिल कपूर यांनी मोठा खुलासा केला होता. अनिल कपूर यांनी म्हटले की, आता कपूर खानदानामध्ये सर्वात अगोदर अर्जुन कपूर याचे लग्न होणार आहे. मात्र, अर्जुन कपूर हा मलायका अरोरा की दुसऱ्या कोणासोबत लग्न करणार याबद्दल काही खुलासा हा होऊ शकला नाहीये. आता त्यामध्येच यांचे ब्रेकअप झाल्याचे सांगितले जातंय.