मुंबई : मलायका अरोरा हे कायमच चर्चेत असणारे नाव आहे. मलायका अरोरा हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. मलायका अरोरा ही गेल्या काही वर्षांपासून अर्जुन कपूर याला डेट करत आहे. काही दिवसांपूर्वीच मलायका अरोरा ही अर्जुन कपूर याच्यासोबत विदेशात धमाल करताना दिसली. अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा हे एकमेकांचे खास फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर कायमच शेअर करताना दिसतात. अर्जुन कपूर याने मलायका अरोरा हिच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली.
मलायका अरोरा ही डान्स रिअॅलिटी शो झलक दिखला जा 11 मध्ये जजच्या भूमिकेत आहे. झलक दिखला जाच्या सेटवरील एक व्हिडीओ तूफान व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये मलायका अरोरा ही दिसत आहे. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमुळे मलायका अरोरा हिला सोशल मीडियावर तूफान असे ट्रोल केले जात आहे. मलायकाला तिच्या आउटफिटमुळे ट्रोल केले जातंय.
या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, मलायका अरोरा हिला तिच्या ड्रेसमुळे अजिबातच चालता देखील येत नाहीये. चालताना तिला इतर लोकांची मदत ही घ्यावी लागत आहे. मलायका अरोरा हिचा ड्रेस पायामध्ये अडकतोय. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, मलायका हिचा ड्रेस पायामध्ये अडकतो आणि तो निघत देखील नाही.
पायामध्ये अडकलेला ड्रेस काढण्याचा मलायका प्रयत्न करते पण तो निघत नाही. मग दोनजण येतात आणि मलायका अरोरा हिचा अडकलेला ड्रेस काढतात. परत तो ड्रेस तिच्या पायामध्ये अडकताना दिसतोय. मलायका हिला यामुळे सोशल मीडियावर तूफान ट्रोल केले जात आहे. लोक तिचा खडेबोल सुनावताना दिसत आहेत.
एकाने लिहिले की, ही तर तोंडावरच आपटेल. दुसऱ्याने लिहिले की, अरे असे ड्रेस घालतात तरी कशाला? तिसऱ्याने लिहिले की, असे ड्रेस घालण्याची काय गरज आहे, जोरात पडल्याशिवाय हिला अजिबात कळणार नाहीये. काही दिवसांपूर्वीपासून एक चर्चा तूफान रंगताना दिसत आहे की, मलायका अरोरा ही लवकरच अर्जुन कपूर याच्यासोबत लग्न करणार आहे.