मुंबई : मलायका अरोरा हिने नुकताच तिचा 48 वा वाढदिवस साजरा केला. मलायका अरोरा (Malaika Arora) हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. मलायका अरोरा ही सोशल मीडियावर सक्रिय असून चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ (Video) शेअर करताना दिसते. मलायका अरोरा ही आपल्या फिटनेसकडे खास लक्ष देते. अनेकदा मलायका अरोरा ही जीम बाहेर स्पाॅट देखील होते. मलायका अरोरा ही सोशल मीडियावर अत्यंत बोल्ड फोटो शेअर करताना दिसते.
मलायका अरोरा ही तिच्या पर्सनल लाईफमुळे जास्त चर्चेत दिसते. मलायका अरोरा ही अरबाज खान याच्यासोबत घटस्फोट घेतल्यापासून बाॅलिवूड अभिनेता अर्जुन कपूर याला डेट करत आहे. अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा हे कायमच एकमेकांचे खास फोटो हे सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. काही दिवसांपूर्वीच हे विदेशात धमाल करताना दिसले.
अर्जुन कपूर याने मलायका अरोरा हिच्या वाढदिवसानिमित्त एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. विशेष म्हणजे यासोबत त्याने एक फोटो देखील शेअर केला. अर्जुन कपूर याच्यासोबत धमाकेदार डान्स करताना मलायका अरोरा ही वाढदिवसाच्या पार्टीमध्ये दिसली. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसला.
आता नुकताच मलायका अरोरा हिने एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये काही मोठे खुलासे हे मलायका अरोरा हिने केले. काही दिवसांपूर्वी एक चर्चा तूफान रंगताना दिसली की, अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांचे ब्रेकअप झाले असून दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. आता त्याबद्दलच बोलताना मलायका अरोरा ही दिसलीये.
मलायका अरोरा ही म्हणाली की, मी सध्या ज्या टप्प्यामध्ये आहे, तिथे मला बोलायची काहीच गरज नाहीये. मला स्पष्टीकरण देण्याची देखील गरज नाहीये. पुढे मलायका म्हणाली, मी कधीच स्वत: ला बाॅलिवूडची अभिनेत्री म्हणून घेतले नाहीये किंवा मला आजही त्याची गरज नाहीये. या मुलाखतीमध्ये मलायका अरोरा ही तिच्या पर्सनल लाईफबद्दल बोलताना दिसलीये.