मुंबई : अभिनेता अरबाज खान याच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर मलायका अरोरा (malaika arora) आणि अर्जुन कपूर (arjun kapoor) यांच्या नात्याच्या चर्चा रंगू लागल्या. महत्त्वाचं म्हणजे अर्जुन आणि मलायका यांनी त्यांच्या नात्याची कबुली सर्वांसमोर दिली. एवढंच नाही अनेक महत्त्वाच्या ठिकाणी मलायका – अर्जुन त्यांच्या नात्याबद्दल अनेक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करतात शिवाय अनेक ठिकाणी दोघे एकत्र पोहोचतात. एवढंच नाही तर, अभिनेत्री कायम तिच्या आणि अर्जुनच्या नात्याबद्दल अनेक गोष्टी चाहत्यांना सागंत असते. आता देखील मलायकाने अर्जुनसोबत असलेल्या नात्यावर मेठा खुलासा केला आहे.
नुकताच झालेल्या एका मुलाखतीत मलायकाने दुसरं लग्न करण्यासाठी सज्ज असल्याचा खुलासा केला आहे. दुसऱ्या लग्नावर अभिनेत्री म्हणाली, ‘मी लग्नाबद्दल विचार केला आहे. मी प्रेमावर विश्वास ठेवते. पण मी दुसरं लग्न कधी करणार याबद्दल सांगू शकत नाही. काही गोष्टी मला गुपित ठेवायच्या आहेत. सर्व काही आताच सांगितलं तर सगळी मजा निघून जाईल…’
पुढे मलायका म्हणाली, ‘लहान असताना मला एक गोष्ट सांगितली होती. एक नातं हे एखाद्या झाडाप्रमाणे असतं. तुम्ही बी पेरता आणि त्यानंतर ते रोप वाढवण्यासाठी तुम्हाला सतत पाणी घालावं लागतं, काळजी घ्यावी लागते. झाडाप्रमाणेच नात्याचंही तसंच आहे. नात्यात तुम्ही शॉर्टकटचा आधार घेवू शकत नाही. एकमेकांना समजून घ्यावं लागतं…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.
मुलाखतीत मलायकान अर्जुनच्या स्वभावाबद्दल देखील मोठं वक्तव्य केलं आहे. ‘अर्जुन वयापेक्षा अधिक सजदार आहे. त्याच्यासोबत लग्न करण्यासाठी देखील मी तयार आहे…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली. मलायका अरोरा चाहत्यांमध्ये कायम चर्चेत असते.
अर्जुन आणि मलायका यांना त्यांच्या नात्यामुळे अनेकदा ट्रोल करण्यात आलं. अर्जुन आणि मलायका यांच्या वयातील अंतरामुळे देखील दोघांना ट्रोल करण्यात आलं. पण अर्जुन आणि मलायका कोणत्याही गोष्टीला अधिक महत्त्व न देता फक्त आणि फक्त त्यांच्या भावनांना महत्त्व दिलं. आता दोघे अनेकांना कपल गोल्स देतात.
सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत अभिनेत्री कायम चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. मलायका वयाच्या ४९ व्या वर्षी देखील प्रचंड हॉट आणि ग्लॅमरस दिसते.