मलायका अरोरा हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे नाव आहे. मलायका अरोराची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. मलायका अरोरा हिच्या आयुष्यात मोठे वादळ आल्याचे बघायला मिळतंय. मलायका अरोरा हिच्या वडिलांनी 11 सप्टेंबर 2024 रोजी राहत्या इमारतीच्या बाल्कनीतून उडी घेत आत्महत्या केली. मलायकाच्या वडिलांनी आत्महत्या केल्यानंतर मोठी खळबळ बघायला मिळाली. मलायका अरोरा हिचे आई वडील बांद्रात राहत. ज्यावेळी मलायका अरोराच्या वडिलांनी आत्महत्या केली, त्यावेळी घरात फक्त तिची आई होती.
मलायका अरोरा हिच्या वडिलांबद्दल नुकताच मोठा खुलासा करण्यात आलाय. अनिल महेता यांच्याबद्दल त्यांच्या शेजारी राहणाऱ्या महिलेने खुलासा केलाय. शेजारी राहणारी महिला म्हणाली की, अनिल आणि मलायका अरोरा यांचे अत्यंत खास नाते होते. हेच नाही तर अनिल आणि मुलगी मलायका कायमच एकत्र पार्टी करत.
मलायका अरोरा हिचा मुलगा अरहान हा देखील काही दिवस आपल्या आजी आजोबासोबत इथेच राहत होता. पुढे त्या महिलेने सांगितले की, काही दिवसांपूर्वीच आमच्याकडे लिकेजची समस्या होती, त्यावेळी स्वत: अनिल हे बघण्यासाठी पोहोचले होते. मुळात म्हणजे अनिल हे खूप जास्त चांगल्या स्वभावाचे व्यक्ती होते.
ते कायमच येता जाता गप्पा मारत. नेहमीच सर्वांना बोलत. ती महिला पुढे म्हणाली की, अनिल आणि त्यांच्या पत्नीमध्ये खूप चांगले नाते होते. अशाप्रकारे त्यांनी आत्महत्या केल्याने सर्वांनाच मोठा धक्का नक्कीच बसला आहे. मलायका अरोरा हिचे वडील स्वभावाला खूप जास्त छान असल्याचे सांगताना शेजारी दिसत आहेत. अनिल यांनी आत्महत्या नेमकी का केली, याबद्दल अजूनही खुलासा हा होऊ शकला नाहीये.
मलायका अरोरा ही सोशल मीडियावर वडिलांसोबतचे फोटो शेअर करताना दिसते. मलायका अरोरा मोठ्या संपत्तीची मालकीन आहे. अरबाज खान याच्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर मलायका अरोरा ही गेल्या काही वर्षांपासून अर्जुन कपूर याला डेट करत आहे. दोघांचे कायमच फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात.