मलायका लग्नाची पत्रिका घेऊन पोहोचली पहिल्या पतीच्या घरी? व्हिडीओ व्हायरल

| Updated on: Apr 30, 2024 | 2:27 PM

Malaika Arora | अरबाज खान याच्यानंतर मलायका अरोरा देखील करणार दुसरं लग्न, अभिनेत्री लग्नाची पत्रिका घेऊन पोहोचली पहिल्या पतीच्या घरी? व्हिडीओ तुफान व्हायरल, सोशल मीडिया आणि चाहत्यांमध्ये सध्या मलायका हिच्या खासगी आयुष्याची... अर्जुन कपूर याच्यासोबत करणार दुसरं लग्न?

मलायका लग्नाची पत्रिका घेऊन पोहोचली पहिल्या पतीच्या घरी? व्हिडीओ व्हायरल
Follow us on

अभिनेत्री मलायका अरोरा हिने 2017 मध्ये अभिनेता अरबाज खान याच्यापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. दोघांनी अचानक घटस्फोटाची घोषणा केल्यानंतर चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला. मलायका आणि अरबाज यांचा घटस्फोट झाला असला तरी, दोघांमध्ये मैत्रीचं घट्ट नातं आहे. मलायका आणि अरबाज कायम मुलगा अरहान खान याच्यासाठी एकत्र येताना दिसतात. नुकताच मलायका हिचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला. व्हिडीओमध्ये अभिनेत्री पहिला पती अरबाज खान याच्या घराबाहेर स्पॉट करण्यात आलं.

मलायका अरोरा हिचा व्हिडीओ Instant Bollywood या अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये मलायका हिच्यासोबत मुलगा अरहान खान देखील दिसत आहे. घटस्फोटानंतर देखील अभिनेत्री पहिल्या पतीच्या का पोहोचली? यांसारखे अनेक प्रश्न चाहते अभिनेत्रीला विचारत आहेत.

हे सुद्धा वाचा

 

 

मलायका हिला पाहताच अभिनेत्रीला कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी पापाराझींनी गर्दी केली. पण यावेळी अभिनेत्रीने पापाराझींकडे दुर्लक्ष केलं. मलायका हिचा व्हिडीओ पाहिल्यानंतर एक नेटकरी म्हणाला, ‘सर्व ठिक तर आहे ना?’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘मलायका… इतकी घाई अखेर कोणत्या गोष्टीची..’, तर तिसरा नेटकरी म्हणाला, ‘अरबाज याला स्वतःच्या लग्नाची पत्रिका द्यायला पोहोचली का?’ अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांकडून येत आहेत.

अरबाज खान – मलायका अरोरा यांचा मुलगा

अरबाज खान – मलायका अरोरा यांचा मुलगा अरहान खान याने पॉडकास्ट ‘डम्ब बिरियानी’ च्या माध्यमातून करियरची सुरुवात केली आहे. शोमध्ये मलायका हिने अरहान याला असे काही प्रश्न विचारले, ज्यामुळे अभिनेत्रीने अनेकांवर निशाणा साधला. अरहान याच्या शोमध्ये अरबाज आणि मलायका देखील आले होते.

दुसऱ्या लग्नावर मलायका हिची प्रतिक्रिया

एका कार्यक्रमात मलायका अरोरा म्हणाली होती, ‘100 टक्के लग्न करण्यासाठी तायर आहे. जर कोणी मला लग्नासाठी विचारेल, तेव्हा दुसऱ्या लग्नासाठी तयार होईल असं अभिनेत्री म्हणाली…’ मलायका हिने असं वक्तव्य केल्यानंतर पुन्हा अर्जुन कपूर याच्यासोबत असेल्या नात्याच्या चर्चांनी जोर धरला होता.