Malaika Arora: अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी तर, खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून मलायका, अभिनेता अर्जुन कपूर याच्यासोबत झालेल्या ब्रेकअपमुळे चर्चेत आहे. दोघांच्या ब्रेकअपची चर्चा रंगलेली असताना खान कुटुंबाच्या एका कार्यक्रमात अभिनेत्रीला स्पॉट करण्यात आलं. सांगायचं झालं तर, अभिनेता सलमान खान याची बहीण अर्पिता खान शर्मा हिने मुंबईत स्वतःचं रेस्टोरेंट लॉन्च केलं आहे. नवीन रेस्टोरेंट लॉन्च केल्यामुळे एका पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं.
पार्टीमध्ये अर्पिता हिला पती आयुष शर्मा याच्यासोबत स्पॉट करण्यात आलं. खान कुटुंबातील इतर सदस्य देखील पार्टीसाठी आले होते. अर्पिता हिच्या रेस्टोरेंटचं नाव Mercil असं आहे. रेस्टोरेंट लॉन्च दरम्यान अभिनेता सलमान खान आणि अरबाज खान उपस्थित नव्हते. पण मलायका आणि सीमा दोघींना स्पॉट करण्यात आलं.
अर्पिता हिच्या रेस्टोरेंट लॉन्च इव्हेंटमध्ये मलायका अरोरा आणि सीमा सजदेह यांना स्पॉट करण्यात आलं. सांगायचं झालं तर, गेल्या काही दिवसांपासून मलयाक अर्जुन कपूर याच्यासोबत अशलेल्या नात्यामुळे चर्चेत आहेत. त्यामुळे अर्पिता हिच्या पार्टीमध्ये मलायका दिसताच चर्चांना उधाण आलं आहे. पार्टीमध्ये मलायकाचा मुलगा अरहान खान देखील उपस्थित होता.
रिपोर्टनुसार, मलायका हिच्या आधी अर्जुन कपूर याने भाईजानची बहीण अर्पिता खान हिला डेट केलं आहे. पण अर्जुन आणि मलायका यांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. अशात जेव्हा अर्जुन याने मलायका हिला डेट करण्यास सुरुवात केली, तेव्हा सलमान खान आणि मलायका अरोरा यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला.
अर्जुन कपूर याच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर मलायका हिला खान कुटुंबासोबत पाहिल्यानंतर चर्चांना उधाण आलं आहे. सध्या सर्वत्र मलायका हिची चर्चा रंगली आहे. अभिनेत्री कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.
मलायका आणि अरबाज यांनी अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. 1998 मध्ये मलायका आणि अरबाज यांनी लग्न केलं. दोघांना एक मुलगा देखील आहे. त्यांच्या मुलाचं नाव अरहान खान असं आहे. पण मलायका – अरबाझ यांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. 2017 मध्ये दोघांनी घटस्फोट झाल्याची अधिकृत घोषणा केली.