मलायका अरोराने वयाच्या 25 व्या वर्षी का केलं लग्न, पोटगीच्या मुद्द्यावर अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर

| Updated on: Mar 10, 2024 | 9:43 AM

अभिनेत्री मलायका अरोरा सध्या अभिनेता अर्जुन कपूर याच्यासोबत आनंदी आयुष्य जगत आहे. पण एक दिवस असा आला जेव्हा अभिनेत्रीला अरबाज याच्यासोबत लग्न केल्याचा पश्चाताप होऊ लागला... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मलायका अरोरा हिचीच चर्चा

मलायका अरोराने वयाच्या 25 व्या वर्षी का केलं लग्न, पोटगीच्या मुद्द्यावर अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर
Follow us on

मुंबई | 10 मार्च 2024 : अभिनेत्री मलायका अरोरा हिने आतापर्यंत अनेकदा घटस्फोटावर स्वतःचं स्पष्ट मत मांडलं आहे. वयाच्या 25 व्या वर्षी मलायका हिने अभिनेता अरबाज खान याच्यासोबत लग्न केलं. पण 19 वर्षांच्या संसारानंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतर मलायकाला अनेक वाईट गोष्टींचा सामना करावा लागला. एवढंच नाहीतर, घटस्फोटानंतर मलायका पोटगी स्वरूपात गजगंज पैसा मिळाला आणि त्यावर तिचा खर्च सुरु आहे… अशा देखील अनेक चर्चा रंगल्या होत्या.

आता नुकताच झालेल्या एका मुलाखतीत मलायकाने घटस्फोट आणि पोटगीवर मोठं वक्तव्य केलं आहे. वयाच्या 25 व्या वर्षी लग्नासाठी कोणी माझ्यावर दबाव टाकला नव्हता… जे काही मी केलं, तो माझा स्वतःचा निर्णय होता… असं अभिनेत्री म्हणाली.
‘ठराविक वयात लग्न झालं पाहिजे… अशा वातावरणार मी वाढलेली नाही.. माझ्या कुटुंबाकडून मला पाठिंबा होता. मला माझं आयुष्य स्वतःच्या अटींवर जगण्याचं स्वतंत्र्य होतं. बाहेर जावून मज्जा करणं, अनेक नव्या व्यक्तींसोबत ओळखी वाढवणं…. यांसारख्या गोष्टींसाठी मला कायम सांगितलं गेलं आहे.’

‘वयाच्या 22 – 23 व्या वर्षी लग्न करायला हवं असा विचार माझ्या डोक्यात कसा आला मला माहिती नाही. कोणी माझ्यावर दबाव टाकला नव्हता. पण मला तेव्हा असं वाटलं लग्न करायला हवं आहे. तेव्हा माझ्याकडे दुसरा कोणता पर्याद देखील नव्हता. पण लग्नाच्या काही वर्षांनंतर माझ्या लक्षात आलं… जे माझ्याकडे आहे ते मला नकोय…’

हे सुद्धा वाचा

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘जेव्ही मी अरबाजपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला तेव्हा अनेकांनी माझा विरोध केला. मी जेव्हा घटस्फोट घेतला, तेव्हा इंडस्ट्रीतील अन्य महिला देखील घटस्फोट घेऊन स्वतःचं आयुष्य नव्याने सुरु करत होत्या. मला मझ्या स्वतःसाठी, माझ्या विकासासाठी आणि माझ्या मुलाच्या चेहऱ्यावर आनंद पाहण्यासाठी मी सर्वकाही केलं.’

‘घटस्फोट घेतल्यानंतर अनेक जण माझ्याकडे वाईट नजरेने पाहात होते. पण मला माझ्या आसपासच्या लोकांना आनंदी पाहायचं होतं. सर्वात आधीतर मला माझी स्वतःची ओळख निर्माण करायची होती. स्वतःला आनंदी ठेवायचं होतं.’ आज मलायका हिला कोणत्याही ओळखीची गरज नाही.

मुलाखतीत मलायकाने तिच्या महागड्या कपड्यांबद्दल देखील मोठं वक्तल्य केलं. घटस्फोटानंतर मलायकाने एक ड्रेस घातला होता. त्या ड्रेसच्या किंमतीबाबत देखील चर्चा रंगली होती. पोटगीमध्ये गडगंज पैसा मिळाला असेल म्हणून महागडे कपडे खरेदी करु शकते… हे सगळं वाचल्यानंतर मलायकाला मोठा धक्का बसला होता.

मलायका हिने अरबाज याच्यासोबत 12 डिसेंबर 1998 मध्ये लग्न केलं. पण दोघांचं लग्न फार काळ टिकलं नाही. 2017 मध्ये दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. मलायका – अर्जुन यांना एक मुलगा देखील आहे. त्यांच्या मुलाचं नाव अरहान असं आहे. मलायका – अर्जुन विभक्त झाले असले तरी, मुलासाठी एकत्र येतात. तिघांचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.