मुंबई | 26 ऑगस्ट 2023 : गेल्या काही दिवसांपासून मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर यांच्या नात्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. अनेकांना कपल गोल्स देणारं कपल आता विभक्त झाल्याची चर्चा जोर धरत आहे. एक काळ असा होता जेव्हा मलायका आणि अर्जुन यांनी त्यांच्या नात्याचं सत्य सर्वांपासून लपवलं होतं. पण अनेक वर्षांनंतर दोघांनी सर्वांसमोर प्रेमाची कबुली दिली. एवढंच नाही तर अनेक ठिकाणी दोघांना एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं होतं. परदेशात देखील दोघे फिरण्यासाठी एकत्र गेले होते. सोशल मीडियावर एकमेकांसोबत फोटो पोस्ट करत दोघे एकमेकांवर असलेलं प्रेम देखील व्यक्त करत होते. पण आता दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चांनी जोर धरला आहे.
मलायका आणि अर्जुन यांच्या ब्रेकअपच्या चर्चा रंगत असताना अभिनेत्रीने मोठं पाऊल उचललं आहे. मलायकाने अर्जुन याच्या कुटुंबियांना सोशल मीडियावरुन अनफॉलो केल्याची देखील चर्चा रंगत आहे. मलायका हिने अर्जुन याच्या बहिणी अंशुला कपूर, जान्हवी कपूर आणि खुशी कपूर यांनी इन्स्टाग्रामवरुन अनफॉलो केलं आहे.
मलायका हिने अर्जुन कपूर याचे वडील बोनी कपूर आणि अभिनेते अनिल कपूर यांना देखील इन्स्टाग्रामवरुन अनफॉलो केलं आहे. पण तिने अर्जुन याला अनफॉलो केलेलं नाही. अर्जुन – मलायका यांच्या ब्रेकअपच्या चर्चा सध्या जोर धरत आहेत. यावर दोघांनी देखील यावर स्पष्टीकरण दिलेलं नाही.
दरम्यान, नुकताच मलायका हिला मुंबईत स्पॉट करण्यात आलं होतं. पण अभिनेत्रीच्या टी-शर्टवर लिहिल्या मेसेजने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. तिच्या टी-शर्टवर ‘लेट्स फॉल अपॉर्ट’ याचा अर्थ आता वेगळे होवू… असा आहे. अर्जुन आणि त्याच्या ब्रेकअपच्या बातम्यांना मेसेजद्वारे दुजोरा दिला आहे.
मलायका हिच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर अर्जुन याच्या आयुष्यात नव्या महिलेची एन्ट्री झाली असल्याचं समोर येत आहे. ही महिला दुसरी तिसरी कोणी नसून सोशल मीडिया इन्फ्लुएंसर कुशा कपिला आहे. रंगल्या चर्चांवर कुशा कपिला हिने मौन सोडलं आहे. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. पण कुशा कपिला हिने रंगणाऱ्या चर्चा फक्त अफवा असल्याचं सांगितलं आहे.
पण रंगणऱ्या ब्रेकअपच्या चर्चांवर दोघांनी प्रतिक्रिया दिली होती. पण आता यावर दोघांपैकी एकानेही वक्तव्य केलेलं नाही. ज्यामुळे ब्रेकअपच्या चर्चा जोर धरत आहेत. दरम्यान, अर्जुन याने सोशल मीडियावर सोलो ट्रीपचे फोटो पोस्ट केले होते. म्हणून दोघांचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चा रंगल्या. सध्या चाहत्यांमध्ये अर्जुन कपूर आणि त्याच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगत आहे.