Malaika Arora Father Death: बॉलिवूडची प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री मलायका अरोरा हिच्यावर अचनाक दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मलायका हिच्या वडिलांनी स्वतःचं आयुष्य संपवल्यामुळे बॉलिवूडमध्ये खळबळ माजली आहे. अभिनेत्रीच्या वडिलांना इतक टोकाचं पाऊल का उचललं? याची पोलीस कसून चौकशी करत आहे. बुधवारी सकाळी 9 वाजता मलायकाच्या वडिलांनी अखेरचा श्वास घेतला. मृत्यूनंतर मलायकाच्या वडिलांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अनेकांची चौकशी करत आहे. दरम्यान पोलिसांनी अनिल मेहता यांच्या शेजारच्यांची देखील चौकशी केली आहे.
शेजारच्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अनिल मेहता चांगले आणि मनमेळावू व्यक्ती होते. अनिल मेहता यांच्या शेजारच्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘अनिल मेहता एक चांगले व्यक्ती होते. ते सर्वांसोबत प्रेमाने बोलायचे. ते जेव्हा घरी आले होते तेव्हा एकत्र बिरयानी खाण्याचा आमचा प्लान होता. पण आज त्यांच्या मृत्यूची माहिती समोर आली. त्यामुळे मोठा धक्का बसला आहे…’ मलायकाच्या वडिलांच्या निधनामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.
मिळालेल्या माहितीनूसार, मलायका हिचं वडिलांसोबत फार चांगलं नातं नव्हतं. जेव्हा अभिनेत्री फक्त 11 वर्षांची असताना वडिलांनी साथ सोडली. वडिलांनी साथ सोडल्यानंतर मलायकाच्या आईनेच दोन बहिणींचा सांभाळ केला. मलायकाची आई जॉयस मल्याळी ख्रिश्चन आहे, तर अभिनेत्रीचे वडील अनिल हे भारतीय सीमेजवळील फाजिल्का शहराचे पंजाबी हिंदू होते. निवृत्त होण्यापूर्वी अनिल भारतीय मर्चंट नेव्हीमध्ये कार्यरत होते.
लहान असताना मलायका हिला अनेक गोष्टींचा सामना करावा लागला. आयुष्यात आलेल्या अडचणी खुद्द अभिनेत्रीने सांगितलं होत्या. मलायका फक्त 11 वर्षांची असताना वडिलांनी कुटुंबाची साथ सोडली होती. एका कार्यक्रमात अभिनेत्रीने दुःख व्यक्त केलं होतं.
मलायका म्हणाली होती, ‘मी फक्त 11 वर्षांची होती. तेव्हा वडिलांनी माझ्या आईची साथ सोडली. एकट्या आईने माझा आणि बहीण अमृता हिचा सांभाळ केला आहे. ती वेळ आमच्यासाठी फार कठीण होती. अनेक अडचणींचा सामना आम्ही केला आहे…’ जुने क्षण आठवत अभिनेत्रीच्या डोळ्यात पाणी देखील आलं.