तब्बल 25 वर्षांनी मुंबईत परतली प्रसिद्ध अभिनेत्री, विमानतळावर येताच म्हणाली “इथे पाय ठेवला तेव्हा…”

| Updated on: Jan 03, 2025 | 8:23 PM

ममता कुलकर्णी 25 वर्षानंतर मुंबईत परतली असून तिने सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. या व्हिडीओमध्ये ती भावूक झाल्याचं पाहायला मिळाले.

तब्बल 25 वर्षांनी मुंबईत परतली प्रसिद्ध अभिनेत्री, विमानतळावर येताच म्हणाली इथे पाय ठेवला तेव्हा...
ममता कुलकर्णी
Follow us on

अनेक तरुणांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री ममता कुलकर्णी तब्बल 25 वर्षानंतर मुंबईत परतली. वक्त हमारा है, क्रांतिवीर, करण अर्जुन, सबसे बडा खिलाडी, आंदोलन आणि बाजी यासारख्या यशस्वी हिंदी चित्रपटांमध्ये तिने काम केले. आता अभिनेत्री ममता कुलकर्णीने नुकतंच तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने मुंबईबद्दलच्या काही खास आठवणी सांगितल्या आहेत. विशेष म्हणजे तिचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला.

ममता कुलकर्णीची पोस्ट

मुंबईत आल्याचा आनंद व्यक्त करत ममता कुलकर्णीने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. “नमस्कार मित्रांनो, मी ममता कुलकर्णी आणि मी भारत मुंबई आमची मुंबई येथे 24 वर्षानंतर परत आले आहे. मी 2000 मध्ये भारताबाहेर गेले होते. माझ्या संपूर्ण प्रवासाबद्दल खूप भावनिक आहे आणि आता 2024 मध्ये मी येथे आली. मला याचा खूप आनंद होत आहे. मला तो आनंद कसा व्यक्त करावा, हे माहिती नाही. मी खूप भावूक झाली आहे. खरंतर फ्लाईट लँड झाल्यावर किंवा फ्लाईट लँड होण्यापूर्वी मी माझ्या आजूबाजूला असलेल्या गोष्टी पाहत होते. खूप वर्षानंतर मी माझा देशवरून पाहिला आणि तो काळ माझ्यासाठी खास होता. मी भावूक झाले होते. माझ्या डोळ्यात अश्रू आले होते. आंतरराष्ट्रीय मुंबई विमानतळावर पाय ठेवला तेव्हा मी पूर्ण भारावून गेले होते”, असे ममता कुलकर्णीने या व्हिडीओत म्हटले आहे.

पण इतक्या वर्षांनी अभिनेत्री भारतात परतण्याचं कारण काय? हे अद्याप समजू शकले नाही. इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार ममता कुलकर्णी भारतात का परतली याची माहिती देण्यात आली आहे. या रिपोर्टनुसार ममता कुलकर्णी ही 2012 मध्ये कुंभमेळ्याच्या वेळी कुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी आली होती. जानेवारीच्या अखेरीस प्रयागराजमध्ये होणाऱ्या या खास कार्यक्रमासाठी ती पुन्हा आली असल्याचे म्हटले जात आहे. मात्र ममता कुलकर्णी २५ वर्षानंतर मुंबईत परतली आहे, अशी माहिती तिने एका इंस्टाग्राम पोस्टद्वारे दिली आहे.

दरम्यान ममता कुलकर्णीचा वादाशी घनिष्ठ संबंध आहे. 2016 साली ठाणे पोलिसांनी अभिनेत्रीचा दोन हजार कोटींच्या ड्रग्स रॅकेटमध्ये हात असल्याचा आरोप केला होता. तसेच गँगस्टरला इफेड्रिनचा पुरवल्याचा आरोपही तिच्यावर करण्यात आला होता. तिने तिचा साथीदार विकी गोस्वामी आणि इतर सहा आरोपीं सोबत जानेवारी 2016 मध्ये केनिया मध्ये आंतरराष्ट्रीय डक रिंगच्या बैठकीत सहभागी झाल्याचे म्हटले जाते.

‘करण अर्जुन’ चित्रपट पुन्हा प्रदर्शित होणार

ममता कुलकर्णीचा 1995 मध्ये प्रदर्शित झालेला ‘करण अर्जुन’ हा चित्रपट येत्या २२ नोव्हेंबरला पुन्हा प्रदर्शित होत आहे. यात ममतासह शाहरुख खान, सलमान खान, काजल आणि राखी हे कलाकार झळकले होते. राकेश रोशन दिग्दर्शित या चित्रपटाचा ट्रेलर ऋतिक रोशनने पुन्हा इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.