Mamta Kulkarni On Bollywood Comeback: 90 च्या दशकात अभिनेत्री ममता कुलकर्णी हिने बॉलिवूड आणि चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. पण अभिनेत्री अचानक गायब झाल्यानंतर तिच्याबद्दल तुफान चर्चा रंगल्या. ममता अखेर तब्बल 24 वर्षांनंतर भारतात परतली आहे. भारतात परतल्यानंतर बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार? याबद्दल अभिनेत्रीला सतत विचारण्यात येत आहे. अशात नुकताच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीने अनेक गोष्टींचा खुलासा केला. शिवाय ड्रग्स प्रकरणी कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्याबद्दल देखील ममताने मौन सोडलं आहे.
भारतातून गायब होण्याचं कारण सांगत ममता म्हणाली, ‘भारतातून गायब होण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे अध्यात्म… 1996 मध्ये माझा अध्यात्माकडे कल वाढला आणि त्यादरम्यान माझी भेट गुरू गगन गिरी महाराज यांच्याशी झाली. त्यांच्या आगमनानंतर माझी अध्यात्माची आवड वाढली. यानंतर माझी तपश्चर्या सुरू झाली. ‘
24 वर्षा गायब राहिल्याद्दल अभिनेत्री म्हणाली, ‘मी मान्य करते बॉलिवूडने मला प्रसिद्धी, संपत्ती दिली. त्यानंतर बॉलिवूडची साथ सुटली. 2000 ते 2012 पर्यंत मी फक्त आणि फक्त तपस्या करत राहिली. अनेक वर्ष मी दुबईत होती. दोन बेडरूमच्या हॉलमध्ये राहत होती आणि 12 वर्षे ब्रह्मचारी राहिले.’
बॉलिवूडबद्दल अभिनेत्री म्हणाली, ‘आता मी संन्यासी आहे. मला बॉलिवूड किंवा कोणत्यात गोष्टीत काहीही रस नाही. पुन्हा बॉलिवूडमध्ये पदार्पण करावं असं माझं वय देखील राहिलेलं नाही. मला आता अध्यात्मीक आयुष्य जगायचं आहे आणि मला अध्यात्मिक डिबेटमध्ये भाग घ्यायचा आहे, जेणेकरून मी सर्वांना जोडू शकेन.’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.
अभिनेत्री म्हणाली, ‘माझ्याकडे कोणत्या गोष्टीची कमी होती? लोकं असं फक्त पैशांसाठी करतात. तेव्हा माझ्याकडे 10 सिनेमाच्या ऑफर होत्या. माझ्याकडे तीन घं आणि दोन गाड्या होत्या. पण मी बॉलिवूडचा त्याग केला. विक्कीमुळे किंवा प्रसिद्धीमुळे माझ्यावर ड्रग्ज प्रकरणात खोटा गुन्हा दाखल झाला असं मला वाटतं.’
अभिनेत्री पुढे म्हणाली, ‘ज्या अधिकाऱ्याने माझ्याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्या अधिकाऱ्याला देखील फरार घोषित करण्यात आलं. जैसी करनी वैसी भरनी… आज तो आयुक्त कुठे आहे… याची माहिती पोलिसांकडे देखील नाही. शिवाय कोणते पुरावे देखील नाही’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.