घटस्फोटानंतर मानसी नाईक हिच्या आयुष्यात नव्या प्रेमाची एन्ट्री, फोटो पोस्ट करत म्हणाली…

| Updated on: Apr 23, 2024 | 2:15 PM

Manasi Naik | पॅरिसमधील बॉयफ्रेंडच्या प्रेमात मानसी नाईक, त्याच्यासोबत फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने मनातील भावना केल्या व्यक्त..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मानसी नाईक हिच्या खासगी आयुष्याच्या चर्चा... सोशल मीडियावर अभिनेत्रीचा बॉयफ्रेंडसोबत फोटो तुफान व्हायरल...

घटस्फोटानंतर मानसी नाईक हिच्या आयुष्यात नव्या प्रेमाची एन्ट्री, फोटो पोस्ट करत म्हणाली...
Follow us on

गेल्या काही काही दिवासांपासून मराठमोळी अभिनेत्री मानसी नाईक तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. पहिला पती प्रदीप खरेरा याच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर अभिनेत्रीने मुलाखतींच्या माध्यमातून तिच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक धक्कादायक खुलासे केले. पण आता अभिनेत्रीच्या आयुष्यात नव्या प्रेमाची एन्ट्री झाली आहे. सध्या सर्वत्र मानसी आणि तिच्या बॉयफ्रेंडची चर्चा रंगली आहे. मानसी हिने बॉयफ्रेंडसोबत खास फोटो देखील पोस्ट केला आहे. अभिनेत्रीची सोशल मीडिया पोस्ट सध्या तुफान व्हायरल होत आहे.

पॅरिसमधील बॉयफ्रेंडसोबत खास फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये, ‘पॅरिसियन जादू… क्षणांना आठवणींमध्ये बदललं…’ असं लिहिलं आहे. फोटोमध्ये बॉयफ्रेंडसोबत अभिनेत्री आनंदी दिसत आहे. अभिनेत्रीची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चाहते देखील अभिनेत्रीच्या पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. अनेकांनी मानसी हिला नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

 

 

सांगायचं झालं तर, मानसी हिने यापूर्वी देखील आयुष्यात नव्या व्यक्तीची एन्ट्री झाल्याची माहिती चाहत्यांसोबत शेअर केली होती. पण अभिनेत्रीने बॉयफ्रेंडचं नाव सांगितलं नव्हतं. आता बॉयफ्रेंडसोबत फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने त्याला टॅग देखील केलं आहे. अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडचं नाव राहुल खिस्मतराव आसं आहे.

काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत मानसी हिने नव्या बॉयफ्रेंडबद्दल मोठा खुसाला केला होता. पॅरिसला गेलेल्या मानसी हिला अनेक गिफ्ट मिळाले होते. एवढंच नाहीतर, राहुल याने मानसी हिचा वाढदिवस देखील मोठ्या थाटात पॅरिसमध्ये साजरा केला होता.

कोण आहे राहुल खिस्मतराव?

मानसी नाईक हिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असल्यामुळे राहुल खिस्मतराव तुफान चर्चेत आला आहे. सध्या राहुल याचा मानसी हिच्यासोबत फोटो तुफान व्हायरल होत आहे. राहुल अंतराळ शास्त्रज्ञ आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे मानसी देखील जर्मनी याठिकाणी स्थानिक होणार असल्याची माहिती अभिनेत्रीने दिली होती.

मानसी हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने तिच्या डान्समुळे कायम चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर मानसी हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी आभिनेत्री कायम सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.