मंदिरा बेदी हिने काही फोटो शेअर केले आहे. सध्या ती मालदीवमध्ये व्हेकेशनवर आहे. मालदीवमधून तिने अनेक व्हिडिओ शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती तिच्या दोन्ही मुलांसोबत दिसत आहेत. आपल्या जिवलग मैत्रिणीसोबत अनेकदा व्हेकेशन प्लॅन करणारी मंदिरा आता आपल्या मुलांसोबत वेळ घालवताना दिसत आहे. मंदिराने अनेक व्हिडिओ शेअर केलेत. या व्हिडिओमध्ये मंदिरा समुद्रावर बांधलेल्या रिसॉर्टच्या पूलमध्ये पाणी आणि सूर्यप्रकाश दोन्हीचा आनंद घेताना दिसत आहे.
मालदीवमधील व्हिडिओ शेअर केल्यानंतर मंदिराच्या या व्हिडिओवर लोकं पोस्टला खूप पसंत करत आहेत. या झलकमध्ये मंदिरा खूपच फिट आणि स्लिम दिसत आहे. या वयात देखील इतकी स्टनिंग कशी दिसू शकते असा प्रश्न ही लोकांनी केला आहे. काही लोकांनी तिला सल्ला दिला आहे की ती इतकी फिट आहे की तिने बाँड चित्रपटासाठी प्रयत्न करावेत.
व्हिडिओमध्ये मंदिरा मुलांसोबत मस्ती करताना दिसत आहे. ती मुलांसोबत पूलमध्ये उडी मारतानाही दिसत आहे. सर्वोत्कृष्ट उडी कोणी मारली, असा प्रश्नही तिने विचारला आहे. मंदिरा ज्या पद्धतीने आपल्या दोन्ही मुलांचे संगोपन करत आहे आणि त्यांना सिंगल पॅरेंटचे प्रेम देत आहे, ते पाहून लोकांनी तिचे खूप कौतुक केले आहे. एका युजरने म्हटले की- तुम्ही तुमच्या मुलांची किती छान काळजी घेत आहात.
2021 मध्ये मंदिरा बेदी हिचा पती राज कौशल यांचं निधन झालं होतं. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं. आता ती दोन्ही मुलांचे संगोपन एकटीच करत आहे. लग्नाच्या सुमारे 13 वर्षानंतर, 2011 मध्ये त्यांना एक मुलगा वीर झाला आणि 2020 मध्ये त्यांनी तारा ही 4 वर्षांची मुलगी दत्तक घेतली, जी आता 8 वर्षांची आहे.