मुंबई : मंदिरा बेदी हे नाव टीव्ही आणि बॉलिवूड इंडस्ट्रीमधलं एक मोठ्या नावापैकी आहे. तिने अनेक हिट मालिका आणि सिनेमांमध्ये काम केले आहे. ती होस्ट म्हणून देखील अनेक कार्यक्रमांमध्ये दिसते. क्रिकेट सामन्यांमध्ये देखील ती अनेकदा अँकरिंग करताना दिसली आहे. फिटनेसच्या बाबतीत ही ती अधिक काळजी करते. पण सध्या मंदिरा बेदी ही तिच्या Video मुळे चर्चेत आली आहे. होळी साजरी करत असतानाचा तिचा एक व्हिडिओ पुढे आला आहे. ज्यामुळे लोकं तिला ट्रोल करत आहेत. या व्हिडिओमध्ये मंदिरा बेदी तिचा चेहरा स्वच्छ करताना दिसत आहे. ती पिवळ्या रंगाने भरलेली दिसत आहे. यावेळी ती सगळ्यांसोबत होळीचे सेलिब्रेशन करताना दिसली.
मंदिरा बेदी हिने शेअर केलेल्या व्हिडिओवर एक युजर म्हणतो की, ‘पतीला जाऊन काही दिवस झाले आणि ही होळी खेळत आहे.
मंदिरा बेदी हिने १४ फेब्रुवारी १९९९ रोजी राज कौशल सोबत विवाह केला होता. 2011 मध्ये दोघांनी एका मुलाला जन्म दिला. 2013 मध्ये मंदिरा आणि राजने एका चार वर्षाच्या मुलीला दत्तक घेतले होते. असा संपूर्ण परिवार असताना 30 जून 2021 रोजी राज याचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.