मुंबई | 20 जुलै 2023 : मणिपूरमधील परिस्थिती दिवसेंदिवस नियंत्रणाबाहेर जाताना दिसत आहे. 4 मे रोजी घडलेल्या तिथल्या एका घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोन महिलांची विवस्त्र धिंड काढली जात असल्याचं दिसत आहे. या व्हिडीओवर सर्वच क्षेत्रातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून मौन बाळगलेल्या सेलिब्रिटींनीही अखेर त्यावर कमेंट करण्यास सुरुवात केली आहे. अभिनेता अक्षय कुमारने सर्वप्रथम याविषयी ट्विट केलं. त्यानंतर कुमार विश्वास, प्रियांका चोप्राची बहीण मीरा चोप्रा यांनीसुद्धा ट्विट करत मणिपूरच्या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला.
मणिपूरच्या घटनेवरून कुमार विश्वास यांनी मुख्यमंत्री बिरेन सिंह यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘कुर्सी है तुम्हाला ये जनाजा तो नहीं है? कुछ कर नहीं सकते तो उतर क्यों नहीं जाते?’, असा सवाल त्याने या ट्विटद्वारे केला आहे.
“कुर्सी है तुम्हारा ये जनाज़ा तो नहीं है ?
कुछ कर नहीं सकते तो उतर क्यों नहीं जाते ?”@NBirenSingh— Dr Kumar Vishvas (@DrKumarVishwas) July 19, 2023
‘मणिपूरमधील महिलांवरील अत्याचाराचा व्हिडीओ पाहून मी हादरलो. दोषींना इतकी कठोर शिक्षा मिळावी की पुन्हा असं भयानक कृत्य करण्याचा कोणी विचारही करणार नाही अशी मी अपेक्षा करतो’, असं ट्विट अक्षय कुमारने केलं आहे.
प्रियांका चोप्राची बहीण आणि अभिनेत्री मीरा चोप्रानेही याविषयी ट्विट केलं आहे. ‘मणिपूरमध्ये महिलांचा विनयभंग, त्यांची विवस्त्र धिंड काढली जात आहे. हा व्हिडीओ धक्कादायक आहे. हे खरंच घडतंय का? जर या गोष्टींचा तुम्हाला राग येत नसेल तर काही होऊ शकत नाही. भाजपने ही गुंडगिरी थांबवण्यासाठी हस्तक्षेप करावा. मणिपूर हिंसाचाराबाबत बाळगलेल्या मौनावर प्रश्न उपस्थित होतोय’, असं तिने लिहिलं.
The video of women being molested, paraded naked in #Manipur is shocking. Is this really happening? If this doesnt anger you, then nothing will. Its high time @BJP4India intervenes to stop this hooliganism. Their silence on #Manipur_Violence is highly questionable now.
— Meera Chopra (@MeerraChopra) July 19, 2023
आपल्या ट्विट्समुळे सतत चर्चेत राहणाऱ्या कमाल आर. खान यानेसुद्धा मणिपूरमधील घटनेवर संताप व्यक्त केला आहे. ‘मणिपूरमध्ये जे काही घडतंय, ते अत्यंत लज्जास्पद आणि घाणेरडं आहे. हा अत्याचार पाहिल्यानंतर जे लोक गप्प आहेत, ते एक नंबरचे निर्लज्ज आहेत. त्यांना माणूस म्हणण्याचा काहीच हक्क नाही’, असं त्याने म्हटलंय.
When horrific incidents occur make no mistake, through the system, our leaders are IMMEDIATELY aware. When months later videos go viral, twitter is aware. If leaders only then respond, it’s to twitter, not horrific incidents. They care about online outrage, not real people.
— Vir Das (@thevirdas) July 20, 2023
कॉमेडियन वीर दासने मणिपूर हिंसाचारावर ट्विट करत लिहिलं, ‘जेव्हा भयंकर घटना घडतात तेव्हा कोणतीही चूक न होता व्यवस्थेद्वारे आपल्या नेत्यांना लगेच त्याची माहिती मिळते. जेव्हा काही महिन्यांनंतर व्हिडीओ व्हायरल होतो, तेव्हा ट्विटरला त्याची माहिती असते. जर फक्त तेव्हा नेते प्रतिक्रिया देत असतील तर हा ट्विटरचा दोष आहे, भयंकर घटनांचा नाही. ते फक्त ऑनलाइन आक्रोशाची काळजी घेत आहेत, वास्तविक लोकांची नाही’, अशा शब्दांत त्याने निशाणा साधला आहे.