Manisha Koirala: अभिनेत्री मनिषा कोईराला हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. एककाळ असा होता जेव्हा सर्वत्र फक्त आणि फक्त मनिषा हिची चर्चा असायची. एकापेक्षा एक सिनेमात दमदार भूमिका साकारत मनिषा हिने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. स्टारडम आणि प्रसिद्धी मिळाल्यानंतर मनिषा हिचा अहंकार देखील वाढत होता. खुद्द अभिनेत्रीने याबद्दल एका मुलाखतीत मोठा खुलासा केला आहे. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत मनिषा हिने स्वतःबद्दल मोठा खुलासा केला आहे.
मुलाखतीत मनिषाला विचारण्यात आलं, ‘करियर उच्च शिखरावर असताना तुझ्यामध्ये काही बदल झाले. तू कधी स्वतःला इतरांपेक्षा वेगळं समजलं…?’ यावर उत्तर देत मनिषा हिने मोठा खुलासा केला आहे. अभिनेत्री म्हणाली, ‘हो… मला असं वाटतं की माझ्यात बदल झाले होते.’
‘माझ्यातील अहंकार दिवसागणिक वाढत होता. मेहनत न करता यश मिळाल्यानंतर अहंकार वाढतो… त्यामुळे माझ्यात देखील बदल झाले होते. तेव्हा मी तरुण होती आणि समज नव्हती. त्यामुळे तेव्हा फार काही कळत नव्हतं. जगाबद्दल देखील फार काही माहिती नव्हतं आणि स्वतःबद्दल देखील फार काही माहिती नव्हतं…’ असं अभिनेत्री म्हणाली.
‘मी आयुष्यात अनेक चुका केल्या. ज्याचा मला आज पश्चाताप होत आहे. पण मला असं नाही वाटत की, मी कोणती मोठी चुक केली आहे. मी आयुष्यात जर कोणती चूक केली असेल तर ती चूक माझ्या स्वतःसाठी केली असेल… यामध्ये काहींच्या भावना दुखावल्या देखील असतील…’
पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘मी फार संवेदनशील व्यक्ती आहे. माझ्या आयुष्यात माझ्या आई – वडिलांचा फार मोठा वाटा आहे. मी यशाच्या शिखरावर पोहोचली तरी माझ्या आई – वडील मला जमीनीवर राहायला सांगतील.’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.
मनिषा कोईराला हिच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, नुकताच अभिनेत्री ‘हीरामंडी’ वेबसीरिजच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आली. सीरिजमधील मनिषाच्या भूमिकेला चाहत्यांनी डोक्यावर देखील घेतलं. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी मनिषा कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.