मुंबई : अभिनेता मनोज बाजपेयी हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याने त्याच्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. त्याचे चाहतेही लाखोंच्या संख्येत आहेत. मनोज बाजपेयी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. तो त्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असतो. तसंच आता त्याने त्याच्या आयुष्यातला एक किस्सा शेअर केला आहे. त्यामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
मनोज बाजपेयीने नुकतीच कर्ली टेल्सला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यानं त्याच्या आयुष्यातील एक किस्सा सांगितला आहे. मनोज जेव्हा पहिल्यांदा फ्रान्सला परफॉर्म करण्यासाठी गेला होता, तेव्हा त्याने फ्लाइटमध्ये खूप मद्यपान केले होते. याबाबत त्याने मुलाखतीत खुलासा केला आहे.
मनोज बाजपेयीने सांगितलं की, जेव्हा मी नाटकात काम करत होता तेव्हा मी पॅरिसला गेला होता. तो माझा पहिलाच आंतरराष्ट्रीय दौरा होता. जेव्हा मी फ्लाइटमध्ये होता तेव्हा मी दारू अजिबात प्यायली नाही, कारण माझ्याकडून पैसे खर्च होतील असे मला वाटत होते आणि माझ्याकडे त्यावेळी जास्त पैसेही नव्हते. थिएटरच्या निमित्ताने मी तिथे जात होतो.
तिथे गेल्यानंतर फ्लाइटमध्ये मोफत दारू दिली जात असल्याचं मला समजलं. त्यासाठी ते पैसे घेत नव्हते. त्यामुळे मी तिथून परत येत असताना भरपूर दारू प्यायली होती आणि फ्लाइटमध्येच बेशुद्ध पडलो होतो.
पुढे मनोज बाजपेयीने आणखी एक किस्सा सांगितला. तो म्हणाला की, मी पॅरिसमध्ये एका पार्टीला गेला होतो. त्या पार्टीत लोक चॉपस्टिक्सने जेवण करत होते. त्यामुळे मी देखील चॉपस्टिक्सने खाण्याचा प्रयत्न केला, पण सगळं अन्न पुन्हा खाली पडत होते. तेव्हा एका महिलेने मला मदत केली. त्या महिलेने मला काट्याचा चमचा दिला आणि तुम्ही याने खाऊ शकता, असे सांगितले.
दरम्यान, मनोज बाजपेयी हे आज चित्रपटसृष्टीतील एक मोठे व्यक्तिमत्त्व आहे. तो द फॅमिली मॅन या सीरिजमुळे चांगलाच प्रसिद्धीझोतात आला आहे. तसंच आता त्याचे चाहते फॅमिली मॅनच्या तिसऱ्या सीझनची आतुरतेनं वाट पाहत आहेत.