Lalbaugcha Raja | ‘मिस वर्ल्ड’ मानुषीचा VIP एण्ट्रीला नकार, सर्वसामान्यांच्या रांगेतून घेतलं लालबागचा राजाचं दर्शन

| Updated on: Sep 27, 2023 | 9:15 AM

'लालबागचा राजा'च्या दर्शनासाठी दररोज लाखो भाविक येतात. हे भाविक दहा ते बारा तास बाप्पाच्या दर्शनासाठी रांगेत उभे असतात. मात्र सेलिब्रिटींना व्हीआयपी दर्शन दिलं जातं. यावरून अनेकदा टीका झाली. मात्र मानुषी छिल्लरने सर्वसामान्यांच्या रांगेतून लालबागचा राजाचं दर्शन घेतलं.

Lalbaugcha Raja | मिस वर्ल्ड मानुषीचा VIP एण्ट्रीला नकार, सर्वसामान्यांच्या रांगेतून घेतलं लालबागचा राजाचं दर्शन
Manushi Chhillar
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई | 27 सप्टेंबर 2023 : गणेशोत्सवानिमित्त दररोज असंख्य भाविक ‘लालबागचा राजा’च्या दर्शनासाठी तासनतास रांगेत उभे राहत आहेत. सर्वसामान्यांसोबतच दररोज विविध सेलिब्रिटीसुद्धा राजाच्या दर्शनासाठी पोहोचत आहेत. आतापर्यंत शाहरुख खान, शिल्पा शेट्टी, सनी लिओनी, वरुण धवन, कार्तिक आर्यन यांसारख्या सेलिब्रिटींनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलंय. जिथे सर्वसामान्य भाविक दर्शनासाठी 10-12 तास रांगेत उभे राहत आहेत, तिथे सेलिब्रिटींना दिल्या जाणाऱ्या व्हीआयपी दर्शन व्यवस्थेवरून अनेकदा प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. अशातच एका सेलिब्रिटीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. माजी मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरने सर्वसामान्यांच्या रांगेत उभं राहून लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं आहे. या व्हिडीओमध्ये ती भाविकांच्या गर्दीत उभी असल्याचं पहायला मिळत आहे.

मानुषीचा हा व्हिडीओ पापाराझींनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. या व्हिडीओमध्ये मानुषी इतरांप्रमाणेच सर्वसामान्य रांगेत उभी असल्याचं पहायला मिळत आहे. तिच्याभोवती भाविकांची गर्दी आहे. ‘गर्दीत उभ्या असलेल्यांना हे माहीत नाही का, की त्यांच्यामध्ये मिस वर्ल्ड उभी आहे’, असा प्रश्न एकाने विचारला आहे. तर ‘किमान सर्वसामान्यांच्या रांगेतून जाण्याची हिंमत तरी त्यांच्यामध्ये आहे. पण तिला दर्शन मिळालं नसल्याचं पाहून वाईट वाटलं’, असंही दुसऱ्या युजरने लिहिलं आहे.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ

मानुषीने किमान सर्वसामान्यांप्रमाणे गर्दीतून जाण्याचा प्रयत्न तरी केला, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी तिचं कौतुक केलं आहे. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी सेलिब्रिटींनी VIP ट्रिटमेंट दिली जात असल्यामुळे याआधी अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. उर्फी जावेदनंही जेव्हा व्हीआयपी दर्शन घेतलं, तेव्हा सोशल मीडियावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे मानुषीचा हा नम्र स्वभाव सध्या चर्चेत आला आहे.