मधूमेह म्हटलं की चिंता वाटणे सहाजिकच आहे. सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे मधूमेह होणं अगदी सामान्य बाब झाली आहे. पण जे लोकं काटेकोरपणे डाएट सांभाळतात त्यांनाही डायबिटीज झाला तर, आणि त्यात जर सेलिब्रिटींची नावे असतील तर अजून आश्चर्य वाटतं. बॉलिवूडमधील असे अनेक सेलिब्रिटी आहेत जे नेहमीच फिट आणि हेल्थी दिसतात, हेल्थी डाएट फॉलो करतात. अशा कित्येक सेलिब्रेटींची नावे या यादीत पाहायला मिळतील.
समंथा प्रभू
काटेकोर डाएट पाळूनही अनेक सेलिब्रिटी डायबिटीजचे शिकार झाले आहेत. ते आजही डायबिटीज प्रतिकार करत आहेत. यात पहिलं नावं येतं अभिनेत्री समंथा प्रभूचे. समंथाला डायबिटीज आहे. समंथा आजही डायबिटीजवर नियंत्रण योग्य ते उपचार घेत आहेत. तसेच निरोगी आहार, व्यायाम याकडे ती जास्त लक्ष देताना दिसते.
सोनम कपूर
त्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरही डायबिटीज पेशंट आहे. सोनम कपूर तर तिच्या डाएटला किती सांभाळते हे सर्वांनाच माहित आहे. पण सोनमही डायबिटीज या आजाराशी लढत आहे. ती केवळ 17 वर्षांची असताना तिला टाईप-1 डायबिटीज असल्याचं समोर आलं. तेव्हापासून हा आजार नियंत्रणात ठेवण्यासाठी निरोगी आहार घेते आणि नियमित व्यायाम करते.
रेखा
सदाबहार अभिनेत्री रेखानेही मधुमेहाशी लढा दिला आहे. . त्यानंतर त्यांनी आपल्या खाण्याच्या सवयी पूर्णपणे बदलल्या. या काळात त्यांनी कोशिंबीर आणि भाज्या खाण्याबरोबरच जंक फूडपासून स्वत:ला दूर ठेवले. आजार नियंत्रीत ठेवण्यासाठी त्या आता नियमित व्यायामही करतात तसेच आपल्या आहाराचीही विशेष काळजी घेतात.
सुधा चंद्रन
प्रसिद्ध नृत्यांगना आणि अभिनेत्री सुधा चंद्रन यांनी त्यांच्या जीवनात अनेक आव्हानांवर मात केली आहे. अभिनेत्री सुधा चंद्रन यांनाही मधुमेह आजार आहे. त्यांनी आपली जीवनशैली बदलून आणि निरोगी आहाराचं पालन करून डायबिटी नियंत्रित ठेवला आहे.
कमल हसन
साऊथ सुपरस्टार कमल हसन यांनाही टाइप-1 डायबिटीज आहे. जिम वर्कआउट्स, अल्कोहोल पासून दूर राहणे आणि योगासने करून कमल हसन यांनी रक्तातील साखर नियंत्रित ठेवली आहे.
फवाद खान
पाकिस्तानी अभिनेता फवाद खानही डायबिटीज पेशंट आहे. त्याला 17 व्या वर्षापासून टाइप 1 डायबिटीज आहे. डायबिटीजवर नियंत्रण ठेवण्यासाठी फवादने इन्सुलिनही घ्यावे लागते होते. मात्र आता त्याने त्याच्या जीवनशैलीमध्ये योग्य तो बदल केला यासोबतच आहार आणि व्यायामावरही लक्ष देण्यास सुरुवात केली आहे.
गौरव कपूर
ॲंकर म्हणून प्रसिद्ध असलेला गौरव कपूरलाही वयाच्या 22 व्या वर्षी मधुमेह झाल्याचं निदान झालं. गौरव कपूर मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी आहाराची विशेष काळजी घेतो. तो शूटिंगच्या वेळी फक्त घरी बनवलेलं अन्न खातो आणि नियमित व्यायाम करणं चुकवत नाही.
निक जोनस
त्यानंतर यात नाव येतं हॉलिवूड गायक आणि अभिनेत्री प्रियांका चोप्राचा पती निक जोनसचा. तो केवळ 13 वर्षांचा असताना त्याला टाइप 1 डायबिटीजचं निदान झालं. निरोगी आहार आणि नियमित ग्लुकोज मॉनिटरिंग सिस्टमसह निक जोनस त्याचा आजार नियंत्रित ठेवण्याचे प्रयत्न करतो.