गेल्या काही दिवसांपासून महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचं प्रमाण वाढताना दिसत आहे. त्याच देशात अनेक ठिकाणी 3 वर्षांच्या मुलींपासून 70 वर्षांच्या वृद्ध महिलेसोबत अत्याचार होत आहेत. नुकताच कोलकाता येथे प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करुन हत्या करण्यात आली. तर बदलापूर येथे चिमुकल्या मुलींवर शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने लैगिंक अत्याचार केले. अशात देशात कोणत्या ठिकाणी महिला सुरक्षित आहेत? असा प्रश्न निर्माण होत आहे. कोलकाता, बदलापूर नंतर पुणे, अंबरनाथ, मुंबई, कोल्हापूर याठिकाणी देखील बलात्कार, अत्याचार घडल्याच्या घटना समोर आल्या…
दिवसागणिक महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचं प्रमाण मोठ्या संख्येने वाढ होत आहे. अशात नराधमांना फाशीची शिक्षा द्या किंवा त्यानंतर आमच्या हवाले करा… अशी मागणी जेनतेकडून होत आहे. सर्व सामान्य जनतेमध्ये तर राग आणि संतापाची लाट दिसून येत आहेत. लोकं मुली, महिलांच्या न्यायासाठी रस्त्यावर उतरले आहेत.
सर्वत्र घडलेल्या धक्कादायक घटनेचे पडसाद उमटलेले असताना सेलिब्रिटी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून संताप व्यक्त करत आहे. एका मराठी अभिनेत्याने सध्याची परिस्थिती पाहिल्यानंतर दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांना पुन्हा येण्यासाठी विनंती केली आहे. सध्या अभिनेत्याची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
आनंद दिघे यांच्या आठवणीत पोस्ट शेअर करणारा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नाही तर, ‘टाइमपास’ सिनेमातील मलेरिया म्हणजे अभिनेता जयेश चव्हाण ( Jayesh Chavan ) आहे. जयेश याने इन्स्टाग्राम स्टोरीवर आनंद दिघे यांच्या भूमिकेतली अभिनेते प्रसाद ओक यांचा फोटो पोस्ट केला आहे.
अभिनेता आनंद दिघे यांच्या आठवणीत म्हणाला, ‘आजची परिस्थिती बघितली तेव्हा सर्वात आधी तुमची आठवण आली साहेब…’ पोस्टमध्ये पुढे अंगावर काटा आणणारं कॅप्शन लिहिण्यात आलं आहे. ‘आज जर तुम्ही असता ना तर कसलाच विचार न करता त्या नराधमाला कापला असता…’
‘आजचा हिंदू तुमते विचार विसरले! हिंदू झोपलाय त्याला जागा करायला एक दिघे साहेबच हवेत… साहेब या ओ परत तुमच्या बहिणी कुठेच सुरक्षित नाहीत… धर्मवीर…’ असं देखील पोस्टमध्ये म्हणण्यात आलं आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्याची पोस्ट व्हायरल होत आहे.
याआधी देखील अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून संताप व्यक्त केला आहे. तुझ्या आसपासच्या अनेकांच्या दृष्टीत तू एक वस्तू आहेस. वस्तू कधी हे सगळं करतात का? वस्तू फक्त वापरल्या जातात. भोगल्या-उपभोगल्या जातात…विनातक्रार…मुली…तू फक्त वापरली जा…’ अशी पोस्ट करत अभिनेता आस्ताद काळे याने संताप व्यक्त केला होता.