‘आईबहिणीवरून शिव्या देणाऱ्यांनी आधी..’; सूरज जिंकल्यानंतर केलेल्या पोस्टवरून ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्याचं उत्तर

| Updated on: Oct 10, 2024 | 12:58 PM

सूरज चव्हाणने 'बिग बॉस मराठी 5' जिंकल्यानंतर एका मराठी अभिनेत्याने लिहिलेली पोस्ट चर्चेत आली होती. या पोस्टवर त्या अभिनेत्याला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं. या ट्रोलिंगनंतर आता त्याने एक नवी पोस्ट लिहित टीकाकारांना उत्तर दिलं आहे.

आईबहिणीवरून शिव्या देणाऱ्यांनी आधी..; सूरज जिंकल्यानंतर केलेल्या पोस्टवरून ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्याचं उत्तर
Suraj Chavan
Follow us on

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सूरज चव्हाणने ‘बिग बॉस मराठी 5’चं विजेतेपद जिंकल्यानंतर विविध प्रतिक्रिया उमटल्या होत्या. सूरजचा केदार शिंदे यांनी एका चित्रपटात मुख्य भूमिकेचीही ऑफर दिली. यानंतर एका मराठी अभिनेत्याने लिहिलेली पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आली होती. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत भूमिका साकारलेला अभिनेता कपिल होनराव याने इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहिली होती. ‘0 वर्षे प्रायोगिक थिएटर, साडेतीन वर्षे टॉपचे सीरिअल करून, स्वत:ला अभिनेता म्हणून सिद्ध करून, सिक्स पॅक ॲब्स, अभिनयावर काम करून, इतके रोज ऑडिशन देतोय.. एक लीडचा ऑडिशन क्रॅक नाही होत. पण हा झापुक झुपुक बोलून बिग बॉसची ट्रॉफी आणि लीड फिल्म घेऊन गेला राव,’ असं त्याने या पोस्टमध्ये म्हटलं होतं. त्यावरून काहींनी त्याला समजून घेऊन प्रतिक्रिया दिल्या, तर काहींनी ट्रोल केलं. आता ट्रोलर्सना कपिलने सडेतोड उत्तर दिलं आहे. कपिलने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक नवी पोस्ट लिहिली आहे.

कपिलची पोस्ट-

‘देव तुम्हा सर्वांचं भलं करो.. आई अंबाबाई तुम्हाला बुद्धी देवो. माझ्या पोस्टमागची भावना तुम्हाला समजली नाही. मला आईबहिणीवरून शिव्या देणाऱ्यांनी आधी मी काय बोललोय हे नीट वाचा. मी बैलाचा रोल केलाय, माझं थोबाड नीट नाही, मला आता कोण साइड रोल पण देणार नाही हे सगळं ठीक आहे. आधी मला काय म्हणायचं आहे ते समजून घ्या, मग शिव्या द्या. मी कधीही सूरज #non-deserving आहे, तो कसा जिंकला, त्याने जिंकू नये असं कधीच नाही बोललो. ना कधी त्याच्या रीलवर वा त्याच्या कंटेंटवर वाईट बोललोय आणि सूरजवर जळण्याचा प्रश्नच येत नाही. ना मी बिग बॉसमध्ये होतो, ना सूरज माझा कॉंपिटेटर आहे. तो जे करतो ते मी ठरवलं तरी उभ्या आयुष्यात कधी करू शकणार नाही. थिएटर, बॅक स्टेज, एकांकिका, टीव्ही करून मी इथपर्यंत आलोय. जे काही छोटंसं यश मिळालं, हे त्याचमुळे,’ असं त्याने लिहिलंय.

हे सुद्धा वाचा

‘आजही संघर्ष करतोय, कुठे तरी मुख्य भूमिका मिळावी म्हणून. पण कुठे तरी मी कमी पडत असेन. मी अजून तितका चांगला अभिनेता नसेन किंवा माझ्या ते नशिबात नसेल. पण यात सूरजला कुठेही मी कमी लेखत नाही. त्या बिचाऱ्याने खूप वाईट दिवस पाहिलेत. त्याचाही संघर्ष आहे आणि आज त्याला जे काही मिळालं आहे ते त्याच्या मेहनतीने, साधेपणामुळे मिळालं आहे. सूरजय या 70 दिवसांपूर्वी पण होता आणि फेमस होता. पण कलर्स मराठीने एक संधी दिली, त्याला बिग बॉसमध्ये घेऊन आले. त्याला थोडंफार ग्रुम केलं आणि आज हे जे काही मिळालं आहे, त्याला भव्यदिव्य.. स्वप्नवत.. त्याच्या नशिबाने.. या फिल्डमध्ये नशीब खूप मोठा रोल प्ले करतं. हे बोलायचं होतं मला. ज्यांनी छान कमेंट करून सपोर्ट केला त्यांना मनापासून धन्यवाद आणि बाकीच्यांना.. देव तुमचं भलं करो’, अशा शब्दांत त्याने ट्रोलर्सना उत्तर दिलंय.