राज्यात महायुतीचं सरकार येण्यात ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ गेमचेंजर ठरली. जुलै 2024 पासून सुरु करण्यात आलेल्या या योजनेअंतर्गंत पात्र महिलांना दरमहा 1 हजार 500 रुपये देण्यात आले. पण आता ‘लाडकी बहीण योजना’ चर्चेचा विषय ठरत आहे. दरम्यान, ‘लाडकी बहीण योजने’वर अभिनेते आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते किरण माने यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. किरण माने यांनी आता ‘लाडकी बहीण योजनेवर’ प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. नुकताच किरण माने यांनी कोणाचंही नाव न घेता बहीण योजने’च्या मुद्द्यावरुन सत्ताधाऱ्यांवर निषाना साधला आहे.
सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत किरण माने म्हणाले, ‘बहिणींनी दरमहा दिलेला खाऊ आणि “पैशे आले का?” हे विचारणारा भाऊ, दोन्हीही गुंडाळून डस्टबीनमध्ये फेकून दिले आहेत! काम झाले, विषय संपला. लाडक्या तायांनो, आता रस्त्यारस्त्यावर समोर येणाऱ्या प्रज्वल आणि ब्रिजभूषणपासून तुम्ही स्वत:च स्वत:चं रक्षण करा.’ सध्या किरण माने यांची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
किरण माने यांच्या पोस्टवर नेटकरी देखील कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘एकदम बरोबर दादा…’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘ते होणारच होतं फक्त निवडणूक होण्याची वाट बघत होते..’, अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘किरणजी परखड सत्य मांडलं आहे…’ सध्या सर्वत्र किरण माने यांच्या पोस्टची चर्चा रंगली आहे.
सांगायचं झालं तर, किरण माने कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. कायम राजकारणावर स्वतःचं ठाम मत मांडणारे किरण माने सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. किरण माने यांची प्रत्येक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आणि चर्चेत असते.
महिलांना आर्थिकदृष्या सक्षम करण्यासाठी महायुती सरकारकडून लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे. अंतरिम अर्थसंकल्पामध्ये या योजनेला मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर जुलैपासून या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येत आहेत. निवडणुकीनंतर महिलांनी 2100 रुपये मिळतील अशी घोषणा देखील करण्यात आली आहे. आता डिसेंबर महिन्याचे पैेसे कधी जमा होणार याची सर्वांना प्रतीक्षा आहे.