‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ सिनेमावर शरद पोंक्षे यांची पहिली प्रतिक्रिया, पोस्ट चर्चेत

| Updated on: Mar 24, 2024 | 1:05 PM

Swatantrya Veer Savarkar Movie | ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ सिनेमावर शरद पोंक्षे यांनी एक फोटो पोस्ट करत पहिली प्रतिक्रिया दिली आहे, सध्या सर्वत्र शरद पोंक्षे यांच्या पोस्टची चर्चा रंगली आहे... सिनेमात अभिनेता रणदीप हुड्डा आणि अंकिता लोखंडे हिने महत्त्वाची भूमिका साकारली आहे...

‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ सिनेमावर शरद पोंक्षे यांची पहिली प्रतिक्रिया, पोस्ट चर्चेत
Follow us on

अभिनेता रणदीप हुड्डा आणि अंकिता लोखंडे स्टारर ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ (Swatantrya Veer Savarkar Movie ) नुकताच प्रदर्शित झाला आहे. सिनेमा बॉक्स ऑफिसवर उत्तम कामगिरी करताना देखील दिसत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ सिनेमाची चर्चा रंगली आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारताचे थोर स्वातंत्र्य सेनानी विनायक दामोदर सावरकर ऊर्फ वीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर अभिनेते शरद पोंक्षे यांनी कोणती प्रतिक्रिया का दिली नाही? असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित झाला. आता सिनेमावर अभिनेते शरद पोंक्षे यांची पहिली प्रतिक्रिया समोर येत आहे. सध्या सर्वत्र अभिनेते शरद पोंक्षे यांनी केलेली पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

वीर सावरकर यांच्या भूमिकेतील रणदीप याचा फोटो पोस्ट करत अभिनेते शरद पोंक्षे म्हणाले, ‘प्रत्येकाने पहायला हवा.मी दुसऱ्या सिनेमात व्यस्त आहे. म्हणून मला अजून बघणं जमलं नाही.पुढील दोन दिवसात मी बघून एक छान व्हिडिओ करून प्रसारित करणार आहे. हे सांगण्याचं कारण खूप लोक मला विचारताहेत की तुम्ही चित्रपटाबद्दल काही का बोलला नाहीत तर सिनेमा अधिक बघावा आणि मग सविस्तर त्यावर बोलावं असं ठरवलेलं आहे. पुढील चार दिवसात माझा व्हिडिओ येईलच.’

हे सुद्धा वाचा

 

 

शरद पोंक्षे यांच्या पोस्टनंतर चाहते त्यांच्या व्हिडीओच्या प्रतीक्षेत आहेत. शरद पोंक्षे यांनी शेअर केलेल्या पोस्टवर चाहले लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. पोस्टवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, ‘आम्हाला खूप आवडला सिनेमा…’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘अतिशय सुंदर सिनेमा, वीर सावरकर’, शरद पोंक्षे यांची पोस्ट व्हायरल होत आहे.

‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ सिनेमाबद्दल काय म्हणाले वीर सावरकरांचे नातू?

वीर सावरकर यांचे नातू रणजीत सावरकर यांनी सिनेमावर प्रतिक्रिया देत म्हणाले, ‘रणदीप हुड्डा याच्यासोबत माझी अनेकदा चर्चा झाली. मी अद्याप सिनेमा पाहिलेला नाही. पण मला माहिती आहे सिनेमासाठी रणदीप हुड्डा याने प्रचंड मेहनत घेतली आहे. त्याने 30 किलो वजन कमी केलं आहे.’

‘सिनेमा एक असं माध्यम आहे, ज्या माध्यमातून भारताचा इतिहास आपण नव्या पिढी पर्यंत पोहोचवू शकतो. मला आशा आहे की त्यांच्यावर आणि इतर क्रांतिकारकांवर आणखी सिनेमे बनतील.’ असं देखील वीर सावरकर यांचं नातू रणजीत सावरकर म्हणाले.