Prajakta Mali on Breakup: अनेक सिनेमे आणि मालिकांमध्ये दमदार भूमिका साकारत अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. पण गेल्या काही दिवसांपासून प्राजक्ता ‘फुलवंती’ सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमा 50 हून अधिक दिवस थिएटरमध्ये होता एवढंच नाही तर, निर्मिती म्हणून देखील प्राजक्ताचा ‘फुलवंती’ पहिलाच प्रयत्न होता आणि अभिनेत्रीचा पहिला प्रयत्न देखील यशस्वी ठरला आहे. आता प्राजक्ता सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत आहे.
नुकताच प्राजक्ता हिने सोशल मीडियावर आस्क मी एनिथिंग सेशन होस्ट केला. . ज्यामध्ये ती म्हणाली, ‘चला आज पहिल्यांदाच अशाप्रकारे गप्पा मारूया. तुमचे प्रश्न विचारा.’ यावेळी प्राजक्ताने चाहत्यांची प्रत्येक प्रश्नांची उत्तर दिली. शिवाय अभिनेत्रीने तिच्या ब्रेकअपबद्दल देखील मोठं वक्तव्य केलं आहे.
प्रश्न उत्तरांच्या खेळात एका चाहत्यांने अभिनेत्रीला विचारलं, ‘तू आर्ट ऑफ लिव्हिंगशी कधीपासून जोडली गेली आहेस? आर्ट ऑफ लिव्हिंगशी तू कशामुळे जोडली गेलीस?’ चाहत्याच्या या प्रश्नाचं उत्तर देताना अभिनेत्रीने तिच्या ब्रेकअपबद्दल सांगितलं आहे.
प्राजक्ता म्हणाली, ‘या गोष्टीला 6 वर्षे झाली आहेत… एका व्यक्तीसोबत झालेल्या ब्रेकअपमुळे मला हे करण्यास मला भाग पाडलं… यामुळे मी स्वतःला परत मिळाले. त्यानंतर ही एक सवय झालं… त्यानंतर जीवनशैली, नित्यनियमाने करण्याची गोष्ट, ताकद झाली. आता ही गोष्ट “सिद्धी” झाली आहे.’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.
‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ ही एक संस्था आहे. ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ ही एक संस्था श्री श्री रविशंकर यांनी स्थापन केलेला एक NGO आहे. या NGO मध्ये श्वास तंत्र, ध्यान आणि योगावर आधारित अनेक सत्रांचे आयोजन केलं जातं. प्राजक्ता कायम तेथील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
प्राजक्ता कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.