मराठमोळ्या अभिनेत्रीचं सिरियल किसिर इमरान हश्मीसोबत चमकणार नशीब, मोठी माहिती समोर

| Updated on: Apr 02, 2024 | 9:30 AM

Emraan Hashmi | 'इमरान हश्मी याच्यासोबत काम करणं म्हणजे...', 'ही' मराठमोळी अभिनेत्री इमरान हश्मीसोबत करणार स्क्रिन शेअर..., अनेक वर्षांचं अभिनेत्रीचं स्वप्न अखेर झाले पूर्ण... नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीने केलाय मोठा खुलासा...

मराठमोळ्या अभिनेत्रीचं सिरियल किसिर इमरान हश्मीसोबत चमकणार नशीब, मोठी माहिती समोर
Follow us on

अभिनेता आणि दिग्दर्शक फरहान अख्तरच्या प्रोडक्शन हाऊस एक्सेल एंटरटेनमेंट अंतर्गत एक नव्हे तर दोन सिनेमांची घोषणा करण्यात आली. फरहान अख्तरने ॲमेझॉन प्राइम व्हिडिओच्या विशेष कार्यक्रमात इमरान हाश्मी आणि प्रतीक गांधी यांच्यासोबतच्या सिनेमांची घोषणा केली. सांगायचं झालं तर, 2022 पासून फरहाण आणि इमरान एकत्र काम करणार असल्याची चर्चा रंगली होती. अखेर दोन वर्षांनंतर फरहान याने आगामी ग्राउंड झीरो (Ground Zero) सिनेमासाठी इमरान याचं नाव पक्क केलं आहे.

ग्राउंड झीरो (Ground Zero) सिनेमात इमरान झळकणार असून, फरहान याच्या दुसऱ्या सिनेमात अभिनेता प्रतीक गांधी मुख्य भूमिकेत झळकणार आहे. सिनेमाचं नाव अग्नी असं असेल.. सध्या सर्वत्र फरहान याच्या आगामी सिनेमांची चर्चा रंगली आहे.

हे सुद्धा वाचा

 

 

फरहान अख्तर याच्या दोन्ही सिनेमात अभिनेत्री कोण?

फरहान अख्तर याच्या दोन्ही सिनेमात प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) मुख्य भूमिकेत झळकणार आहे. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत सई हिने मोठा खुलासा केला आहे. सई म्हणाली, ‘एक्सेल प्रॉडक्शनसोबत काम करण्याचं प्रत्येक कलाकारचं स्वप्न असतं. अशात मला काम करण्याची संधी देखील मिळाली आहे. त्यामुळे मी आनंदी आहे…’

पुढे सई म्हणाली, ‘मी प्रचंड उत्सुक आहे… आम्ही निर्माण केलेली जादू प्रेक्षकांना आवडेल… मझ्यासारखी मेहनत करणाऱ्या लोकांसाठी मी संधीचे दरवाजे खुले करत आहे…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली. याआधी देखील तिने अनेक हिंदी सिनेमांमध्ये काम केलं आहे.

सई हिने भक्षक, हंटर, मिमी, गर्लफ्रेंड यांसारख्या हिंदी सिनेमांमध्ये काम केलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सई हिची चर्चा चर्चा रंगली आहे. सई सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. आता चाहते अभिनेत्रीच्या आगामी सिनेमांच्या प्रतीक्षेत आहेत.