Ganesh Chaturthi 2024: ‘वर्ष कसंही गेलं तरी गणेशोत्सव…’, सोनाली कुलकर्णीचं मोठं वक्तव्य

| Updated on: Sep 07, 2024 | 11:52 AM

Ganesh Chaturthi 2024: 'वर्ष कसंही गेलं तरी गणेशोत्सव...', गणरायाची घरात स्थापना करत सोनाली कुलकर्णीने मनातील भावना केल्या व्यक्त..., सध्या सोशल मीडियावर सोनालीने पोस्ट केलेल्या व्हिडीओची चर्चा...

Ganesh Chaturthi 2024:  वर्ष कसंही गेलं तरी गणेशोत्सव..., सोनाली कुलकर्णीचं मोठं वक्तव्य
Follow us on

Ganesh Chaturthi 2024: आज संपूर्ण देशात गणेशोत्सवामुळे भक्तीमय वातावरण आहे. अनेकांच्या घरात आणि सार्वजनिक मंडळांमध्ये गणरायाचं आगमन झालं आहे. फक्त सर्वसामान्य जनताच नाही तर, सेलिब्रिटी देखील गणरायाच्या भक्तीत तल्लीन झाले आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने देखील राहत्या घरात गणरायाची स्थापना केली आहे. महत्त्वाचं म्हणजे अभिनेत्री शाडूच्या मातीने स्वतः गणरायाची मुर्ती घडवली आहे. शिवाय अभिनेत्री गणेशोत्सवाच्या निमित्ताने भावना देखील व्यक्त केल्या आहे.

सोनाली कुलकर्णी म्हणाली, दरवर्षी काहीतरी वेगळं करु असाच प्रयत्न असतो. मी आणि माझा भाऊ मिळून गणरायाची मुर्ती तयार करतो. खरं तर, तो मुर्ती तयार करतो आणि मी त्याला सहकार्य करते. शाडूची माती आणि शंकराची पिंड आहे, त्याच्याबरोबर आमचा बालगणेशा आहे. यावर्षी जरा सोपी आणि फार अवघड न करता छान मुर्ती करण्याचा प्रयत्न होता.. असं देखील सोनाली म्हणाली.

पुढे सोनाली म्हणाली, ‘वर्षभर प्रत्येकासोबत अनेक चांगल्या वाईट गोष्टी घडत असतात. अडचणी असतात, अव्हान असतात, आनंदाचे क्षण असतात… या सर्वांमध्ये वर्ष कसंही गेलं तरी गणेशोत्सव सारखाच असतो. यंदाचा गणेशोत्सव देखील नेहमी प्रमाणे आहे…’, असं देखील सोनाली कुलकर्णी म्हणाली.

 

 

सोनाली हिने मुर्ती बनवताना देखील व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. अभिनेत्री भावासोबत गणरायाची मुर्ती घडवली आहे. सोनालीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सोनालीने व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये, ‘यंदाचा बाप्पा …. आमचा गणोबा…’ असं लिहिलं आहे. चाहते देखील अभिनेत्रीच्या पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.