Ganesh Chaturthi 2024: सध्या सर्वत्र गणेशोत्सवामुळे उत्साह आणि आनंद आहे. फक्त सर्वसामान्य जनताच नाही तर, सेलिब्रिटी देखील गणरायाच्या भक्तीत तल्लीन झाले आहे. अभिनेते सुबोध भावे यांनी देखील त्यांच्या राहत्या घरी गणरायाचं आगमन केलं आहे. त्यांनी सोशल मीडियावर गणरायासोबत फोटो देखील पोस्ट केले आहे. शिवाय गणेशोत्सवानिमित्त सुबोध भावे यांचा सर्वांना महत्त्वाचा संदेश देखील दिला आहे. सध्या सर्वत्र सुबोध भावे यांची चर्चा आहे.
सुबोध भावे म्हणाले, ‘दरवर्षी आपण प्रत्येक जण गणेशोत्सव आनंदाने उत्साहाने साजरा करतो. कारण गणपतीचं बाप्पाचं एक आगळं-वेगळं स्थान आपल्या मनामध्ये आहे. आपण कोणत्याही कार्याची सुरुवात गणरायाला वंदन करून करतो आणि आमच्याकडे देखील शुटिंग करताना पहिला शॉट आम्ही गणपतीचा घेतो आणि त्यानंतर बाकी शॉट शूट होतात. त्यामुळे जेव्हा त्याचं नाव येतं तेव्हा एका उत्साह आनंद चांगलं काही तरी करण्याची उर्मी जागृक होते.’
पुढे सुबोध भावे म्हणाले, ‘हा 10 दिवसांचा काळ गणरायाचा आहे. त्यामुळे या 10 दिवसांमध्ये जेवढं काही चांगलं करता येईल, समाजासाठी चांगलं करता येईल… आपल्या लोकांसाठी चांगलं करता येईल…याचा प्रयत्न करु आणि त्यामध्ये सातत्य कसं ठेवता येईल… याकडे देखील लक्ष देऊ…’
बदलत्या काळाबद्दल सुबोध भावे म्हणाले, ‘बदल होत असतात. फक्त ते बदल होत असताना नागरिकांच्या आरोग्याशी, त्यांच्या जीवाशी आपण खेळत नाही आहोत ना एवढं आपण पाहिलं पाहिजे. कारण समाजात राहण्याचा आपला जेवढा हक्क आहे, तेवढाच हक्क आजू-बाजूच्या लोकांचा देखील आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे वृद्ध, लहान मुलं, शाळा – कॉलेजमधील मुलं… स्त्रीया… समाजातील या घटकांना सर्वात जास्त आपण सांभाळलं पाहिजे. आपल्या उत्सवाच्या काळात त्यांना त्रास होता कामा नये. कारण गणपती बाप्पाने हे नाही शिकवलं.’
‘उत्साह साजरा करत असताना कोणाला डोळ्याचा त्रास, कोणाला कानाचा त्रास होत नाही ना… हे पाहिलं पाहिजे…कारण कोणाला झालेला त्रास गणरायाला आवडणार नाही…’ असं देखील अभिनेते सुबोध भावे म्हणाले.
सुबोध भावे यांनी इन्स्टाग्रामवर देखील त्यांच्या बाप्पाचे फोटो पोस्ट केले आहेत. फोटो पोस्ट करत त्यांनी कॅप्शनमध्ये “गणपती बाप्पा मोरया” बाप्पा आपल्या सगळ्यांना उत्तम आयुष्य, आरोग्य देवो, सुख, शांती, समाधान देवो हीच त्याच्या चरणी प्रार्थना.. असं लिहिलं आहे. तर सुबोध भावे यांनी काश्मीर गुलमर्ग मधील गंडोला येथील देखावा गणपतीसाठी केला आहे.