पुणे : मराठी दिग्दर्शक, लेखक आणि अभिनेते प्रवीण तरडे (Pravin Tarde) हे नेहमी आपल्या खास शैलीसाठी ओळखले जातात. मग त्यांनी लिहिलेला अनोखा सिनेमा असो किंवा त्या सिनेमातील काही डायलॉग असो. पण एवढेच करून प्रवीण तरडे थांबत नाहीत तर ते आपल्या चाहत्यांसाठी नवनवीन फोटो आणि व्हिडीओ (Video) कायमच शेअर करतात, ज्यामुळे ते नेहमीच चर्चेत राहतात. प्रवीण तरडे यांचा असाच एक खास व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social media) प्रचंड व्हायरल होताना दिसतोयं. या खास व्हिडिओमुळे पुन्हा एकदा प्रवीण तरडे चर्चेत आल्याचे दिसते आहे.
प्रवीण तरडे यांचं आपल्या गावावर, आपल्या शेतीवर किती प्रेम आहे हे नव्याने सांगायची गरज नाही. अनेकदा ते आपल्या शेतात रमलेले पाहायला मिळतात. आताही प्रवीण तरडे यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये प्रवीण तरडे यांनी आपल्या हातात नांगर घेऊन भात शेतीची लागवड केली आहे. या व्हिडिओ प्रवीण तरडे स्वतः बैल जोडी घेऊन शेतात राबताना दिसत आहेत. हाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतो आहे.
शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओला बॅकग्राऊंड गाणं लावण्यात आले आहे. काळ्या मातीत मातीत तिफन चालते. प्रवीण तरडे यांनी या व्हिडिओला दिलेलं कॅप्शन देखील काहीसे वेगळा आहे.”हा चिखल पायाला काय अख्ख्या अंगाला लागला तरी झटकला नाही जात… कारण आपल्या कित्येक पिढ्यांनी हा चिखल एखाद्या दागिन्यासारखा मिरवलाय आपणही मिरवू ..”अशा आशयाचे कॅप्शन त्यांनी या व्हिडिओला दिल आहे. सध्या प्रवीण तरडे यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.