मुंबई : देशाला 1947मध्ये मिळालेलं स्वातंत्र्य ही भीक होती, असं वादग्रस्त विधान बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने (Kangana Ranaut) नुकतच एका मुलाखती दरम्यान केलं आहे. ‘पंगा क्वीन’ कंगनाच्या या विधानावर देशभरातून संताप व्यक्त होत असतानाच, जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांनी मात्र कंगनाच्या या विधानाचं समर्थन केलं आहे. ‘कंगना खरी बोलली. तिच्या मताशी मी सहमत आहे. स्वातंत्र्य भिकेत मिळालं आहे’, अशा शब्दात विक्रम गोखलेंनी कंगनाचं समर्थन केलं होतं.
मात्र, आता विक्रम गोखले यांच्यावर देखील जोरदार टीका होऊ लागली आहे. प्रसिद्ध अभिनेते अतुल कुलकर्णी (Atul Kulkarni) यांनी देखील नाव न घेता विक्रम गोखले यांच्यावर टीकास्र सोडलं आहे. अतुल कुलकर्णी यांचं ‘हे’ ट्वीट सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. तर, अनेक नेटकऱ्यांकडून त्यांचं कौतुक देखील केलं जात आहे.
Seniority and Wisdom are two different things. #globalphenomenon
— atul kulkarni (@atul_kulkarni) November 15, 2021
‘जेष्ठता आणि शहाणपणा या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत’, असं अतुल कुलकर्णी यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे. अवघ्या एका वाक्यचं अतुल कुलकर्णी यांचं हे ट्वीट सध्या तुफान व्हायरल होतंय. कंगनाच्या बेताल वक्तव्याचं समर्थन केल्याबद्दल नेटकरी विक्रम गोखलेंवर टीका करत आहेत, तर दुसरीकडे अगदी नाव न उच्चारताही अतुल कुलकर्णी यांनी केलेल्या या टीकेवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
It is a sixer https://t.co/mrC5hJ83Em
— किशोरदा गणाई ( Kishor PB Ganaee) (@kishorda_jagtap) November 16, 2021
Normally Wisdom comes with Seniority, but in couple of cases…. https://t.co/FkcF2RkP40
— Yogesh Rane (@yyrane) November 16, 2021
Normally Wisdom comes with Seniority, but in couple of cases…. https://t.co/FkcF2RkP40
— Yogesh Rane (@yyrane) November 16, 2021
पुण्यात एका कार्यक्रमात विक्रम गोखले यांनी कंगनाच्या वादग्रस्त विधानाचं समर्थन केलं होतं. भीक मागून स्वातंत्र्य मिळालं असं कंगना तिच्या एका मुलाखतीत म्हणाली होती. तिच्या या म्हणण्याशी मी सहमत आहे. हे स्वातंत्र्य दिलेलं आहे बरं का, असं गोखले म्हणाले. तसेच, ज्या योद्ध्यांनी स्वातंत्र्य मिळवण्याचा प्रयत्न केला. त्या योद्ध्यांना फाशी जाताना त्यावेळचे मोठमोठे लोक बघत राहिले. त्यांनी या योद्ध्यांना वाचवलं नाही. आपल्या देशातील हे लोक ब्रिटिशांविरोधात उभं राहत आहेत, हे माहीत असूनही त्यांना वाचवलं नाही. असेही लोक त्याकाळी आपल्या राजकारणात होते. भरपूर वाचलं आहे मी, असंही त्यांनी सांगितलं.
विक्रम गोखले यांच्या वक्तव्याचा शिवसेनेच्या चित्रपट सेनेकडूनही निषेध करण्यात आलाय. “शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि विक्रम गोखले यांचे कोणतेही नातेसंबंध नाहीत. गोखलेंनी ठाकरेंशी कोणताही संबंध जोडू नये. त्यांनी कंगनाच्या वक्तव्याचे समर्थन मागे घेऊन स्वातंत्र्यवीरांची माफी मागावी,” असे शिवसेना चित्रपट सेनेच्या पश्चिम महाराष्ट्राच्या चिटणीस कीर्ती पाठक यांनी म्हटले आहे.
Marathi Movie | सुयश टिळक-मिताली मयेकरची ‘हॅशटॅग प्रेम’कथा, नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!
चिमुकली अवनी करणार ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद’चं सूत्रसंचालन, वडील देखील सुप्रसिद्ध गायक!