मुंबई : मराठीतील आघाडीचे अभिनेते सुबोध भावे (Subodh Bhave) नेहमीच सोशल मीडियावर सक्रीय असतात, प्रत्येक विषावर ते आपलं मत व्यक्त करत असतात. आता अभिनेते सुबोध भावे यांची एक फेसबुक पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये त्यांनी सोनं आणि चांदीची तुलना पेट्रोल डिझेलसोबत केली आहे.
पाहा पोस्ट
अभिनेते सुबोध भावे यांची पेट्रोल डिझेल दरवाढीवरून खोचक पोस्ट…
सतत असं वाटायचं की या सोनं आणि चांदीचा माज कोणीतरी उतरवला पाहिजे,त्यांना त्यांच्या किंमतीमुळे आपण लैच भारी असं वाटायला लागलं होतं.दरवर्षी सण आला की त्यांचा रुबाब वाढायचा. पण आता नाही ….. कारण आता पेट्रोल आणि डिझेल यांनी सोन्या,चांदीची मस्ती उतरवली. आता दागिने पण यांचेच करणार,बँकेत ठेव म्हणून पण हेच ठेवणार. स्वतःबरोबर अख्खा बाजारभाव वाढवण्याच यांचं कर्तृत्व अफाट आहे . हे दोन नवीन भारीतले दागिने आम्हाला दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद???
सुबोध भावे यांचा जन्म 9 नोव्हेंबर 1975 ला झाला. ते एक लोकप्रिय भारतीय अभिनेते, लेखक, निर्माते आणि दिग्दर्शक आहेत जे मराठी चित्रपटातील त्यांच्या कामासाठी ओळखले जातात. त्यांनी अनेक व्यावसायिक यशस्वी आणि समीक्षकांनी प्रशंसित केलेल्या मराठी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. डॉ. काशिनाथ घाणेकर, बालगंधर्व, कट्यार काळजात घुसली या चित्रपटांमधील कामासाठी ते खास ओळखले जातात.
सुबोधने असंख्य मराठी टीव्ही मालिका, चित्रपट आणि थिएटरमध्ये अभिनय केला आहे. अनेक नामवंत व्यावसायिकांनी त्यांचं कौतुक केलं आहे. त्यांच्या प्रख्यात भूमिकांमध्ये लोकमान्य-एक युग पुरुष या चित्रपटातील बाल गंगाधर टिळक यांच्या भूमिकेचा समावेश आहे, जो देशातील सर्वात मोठ्या समाज सुधारकांपैकी एक बायोपिक आहे. कलाकार नारायणराव राजहंस आणि गंधर्व गाथा नावाच्या पुस्तकावर आधारित असलेल्या बालगंधर्व चित्रपटातही त्यांच्या बालगंधर्वांच्या भूमिकेचं कौतुक झालं.
संबंधित बातम्या
Malti Chahar : सुपर मॉडेल, पण अभिनेत्रीपेक्षाही सरस, दीपक चहरच्या बहिणीचे खास फोटो पाहाच
Sophie Choudry : समुद्रकिनारी बिकिनी परिधान करून सोफी चौधरीने दाखवला बोल्ड अवतार, पाहा क्लासी फोटो