मुंबई : अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar), मराठी सिनेसृष्टीतील एक आघाडीची अभिनेत्री. मराठीसोबतच हिंदीतही तिचा मोठा चाहता वर्ग आहे. सौंदर्य आणि अभिनयाचा सुंदर मिलाफ असणाऱ्या या अभिनेत्रीच्या नृत्याविष्काराचेही अनेक चाहते आहेत. मागील काही महिन्यांपासून अमृता सोशल मीडियावर ‘अमृतकला’ अंतर्गत तिच्या अप्रतिम नृत्याचे व्हिडीओज शेअर करत होती. त्याला चाहत्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. आता तिनं अभिनेत्री मृण्मयी देशपांडेसोबत ‘सूर निरागस हो’ या गाण्यावर ताल धरला आहे.
पाहा व्हिडीओ
अमृतकला बद्दल अमृतानं व्यक्त केल्या भावना
आपल्या या नवीन उपक्रमाबद्दल अमृता खानविलकर म्हणते, ” खरं सांगायचे तर ‘अमृतकला’ला मिळालेल्या चाहत्यांच्या प्रतिसादानंतरच स्वतःचे युट्यूब चॅनेल सुरु कारण्यासाठी अधिक प्रेरित झाले. चाहत्यांना नेहमीच त्याच्या आवडत्या कलाकाराच्या लाइफस्टाईलविषयी कुतूहल असते आणि म्हणूनच मी माझ्या चाहत्यांसोबत माझ्या आयुष्यातील काही गोष्टी शेअर करणार आहे. यात अनेक गोष्टींचा समावेश असेल. हळूहळू ते तुम्हाला कळेलच. सध्यातरी महिन्याला किमान चार -पाच व्हिडिओ शेअर करण्याचा विचार आहे. पुढे बघू कसे जुळून येतेय.”
अमृताने आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत हक्काचे स्थान निर्माण केले आहे. एवढेच नाही, तर ‘खतरोंके खिलाडी’मध्येसुद्धा तिने जोरदार प्रदर्शन केले. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या सतत संपर्कात असते. तिच्या फोटो आणि व्हिडीओंना चाहते भरभरुन प्रतिसाद देतात. ‘जिवलगा’ या मालिकेनंतर आता पुन्हा अमृता कधी दिसणार?, असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे.
सध्याच्या धावपळीच्या जगात कोरोना विषाणूची एंट्री झाली आणि अवघ्या विश्वाची घडीच विस्कटली. आधीच इतर समस्यांशी दोन हात करताना आपल्या शरीराकडे लक्ष देणे काहीसे कमी होत होते. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर सगळ्यांनीच आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली. योगा, व्यायाम आणि आहार यांचा समतोल साधत सगळेच स्वतःला तंदुरुस्त ठेवण्याकडे लक्ष देत आहे. या मोहिमेत ‘वाजले की बारा’ फेम अभिनेत्री अमृता खानविलकही सामील झाली आहे. फिट राहण्यासाठी अनेक कलाकार, सेलिब्रिटी वेगवेगळे फंडे वापरताना दिसतात. फिटनेस रुटीन त्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक असतो. चंदेरी दुनियेत चमकण्यासाठी आणि स्वत:चे व्यक्तिमत्त्व उजळवण्यासाठी जिम, व्यायाम, योगा यांना प्राधान्य दिले जाते. इतकेच नाही, तर या सगळ्याबरोबरच त्यांचे त्यांच्या आहारावरही पुरेपूर लक्ष असते. रोज न चुकता वर्क आऊट करण्यावर या सगळ्या कलाकारांचा जोर असतो.
‘वाजले की बारा’ म्हणत मराठी चित्रपटसृष्टी गाजवणारी, सोबतच बॉलिवूडमध्येही आपल्या ‘राझी’ अभिनयाने प्रेक्षकांची मने जिकणारी अभिनेत्री अमृता खानविलकरही फिट राहण्याकडे नेहमी कटाक्षाने लक्ष देते. वर्क आऊट सोबतच योगा करण्यावर अमृताचा अधिक भर असतो.
संबंधित बातम्या
Bigg Boss 15 : ‘बिग बॉस 15’मध्ये शमिता शेट्टी, निशांत भट्टसह झळकणार ‘हे’ कलाकार, होणार धमाल
Bigg Boss 15 : मध्य प्रदेशच्या जंगलात पार पडला ‘बिग बॉस 15’ चा लॉन्चिंग इव्हेंट, पाहा खास फोटो