शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह 16 आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी विधानसभा उपाध्यक्षांनी नोटीस बजावल्याने कायदेशीर लढाईला तोंड फुटलंय. आमदारांना सोमवारपर्यंत बाजू मांडावी लागणार आहे. शिवसेना आणि शिंदे गटातील संघर्षाला आता कायदेशीर लढाईचं स्वरुप येणार आहे. दुसरीकडे सरकार स्थापनेच्या शक्यतेवर चर्चा करण्यासाठी एकनाथ शिंदे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची गुजरातमध्ये बडोद्यात शुक्रवारी रात्री उशिरा भेट झाल्याचं कळतंय. सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत सोशल मीडियावर सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकजण मतं व्यक्त करत आहेत. त्यातच अभिनेता आरोह वेलकरणचे (Aroh Welankar) काही ट्विट्स सध्या चर्चेत आले आहेत. आरोहने त्याच्या ट्विट्समधून सध्याच्या राजकीय परिस्थितीवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
‘महाराष्ट्रात जे काही घडत आहे ते घराणेशाही राजकारण आणि घराणेशाही राजकीय पक्षांसाठी मोठ्या बदलाचा क्षण असू शकतो. या साऱ्या गोंधळात सर्वसामान्य मतदारांचा नाहक बळी जात असल्याचं पाहून वाईट वाटतं,’ असं त्याने एका ट्विटमध्ये म्हटलंय. तर दुसऱ्या ट्विट्समध्ये त्याने नाव न घेता उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. ‘स्वतःच्या पायावर धोंडा मारून नंतर अडीच वर्षांनी पचतावण्यात काय अर्थ आहे? – अराजकीय’, असं त्याने म्हटलंय. ‘राष्ट्रवादीचे ऐकून ज्या दिवशी तुम्ही मुख्यंमंत्री झालात त्याच दिवशी धोक्याची घंटा वाजायला हवी होती. तुम्ही माणूस म्हणून चांगले असाल पण ते म्हणतात ना ‘Straight trees are cut first’ (सरळ झाडं आधी कापली जातात), असा काहिसा गेम झालाय. तुमच्या लोकांचं ऐका साहेब, राष्ट्रवादीचं नको, ते कधीच कोणाचे नव्हते – एक हिंदू,’ असंही आवाहन त्याने केलंय.
राष्ट्रवादीचे ऐकून ज्या दिवशी तुम्ही मुख्यंमंत्री झालात त्याच दिवशी धोक्याची घंटा वाजायला हवी होती. तुम्ही माणूस म्हणून चांगले असाल पण ते म्हणतात ना “Straight trees are cut first”, असा काहिसा गेम झालाय. तुमच्या लोकांच ऐका साहेब, राष्ट्रवादीचे नको, ते कधीच कोणाचे नव्हते – एक हिंदू
— Aroh Welankar (@ArohWelankar) June 24, 2022
स्वतःच्या पायावर धोंडा मारून नंतर २.५ वर्षांनी पचतावण्यात काय अर्थ आहे? – अराजकीय.
— Aroh Welankar (@ArohWelankar) June 24, 2022
What is happening in #Maharashtra could be a water shed moment for dynastic politics and dynastic political parties. Sad to see the common voters being taken for a toss in all this mess. GoodEvening.
— Aroh Welankar (@ArohWelankar) June 24, 2022
महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर आरोह ट्विटरच्या माध्यमातून वेळोवेळी व्यक्त होताना दिसतो. फारच मोजके कलाकार राजकीय परिस्थितीबाबत सोशल मीडियावर मतं मांडताना दिसतात. त्यापैकीच आरोह एक आहे. अभिनेत्री हेमांगी कवीचीही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत होती. ‘आता कोणाला खरा वाघ म्हणायचं’, अशी पोस्ट तिने फेसबुक, इन्स्टाग्रामवर लिहिली होती. त्यावर नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया उमटल्या होत्या.